शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:59 IST

४०० विद्यार्थी सहभागी, उद्या समारोप

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवास बुधवारपासून प्रारंभ झाला.या महोत्सवात धुळ्यातील मुलांचे, मुलींचे बालनिरीक्षण गृह, कलमाबाई अजमेरा बालनिरीक्षणगृह, जिजामाता बालनिरीक्षण गृह तसेच शिवाजी विद्यालय, नूतन पाडवी विद्यालय, कमलाबाई अजमेरा विद्यालय, व कमलाबाई कन्या शाळेतील एकूण ४०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे.स्पर्धेत जय-पराजय हा होत असतो. त्यामुळे पराजय झाला तरी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढे येणाऱ्या स्पर्धेत जिंकण्याची जिद्द ठेवावी. विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करून यश मिळवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल यांनी उदघटनाप्रसंगी केले.बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रास्ताविक जी.एन. शिंपी यांनी तर सूत्रसंचालन एम.एम.बागूल यांनी केले. आभार अर्चना पाटील यांनी मानले.यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित दुसाणे, बाल न्याय मंडळाचे सदस्य यशवंत हरणे, अ‍ॅड. अनिता भांबेरे, प्रा.डॉ.सुदाम राठोड, प्रा. वैशाली पाटील, आदी उपस्थित होते.दरम्यान या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाºया विद्यार्थ्याची विभागीय महोत्सवासाठी निवड करण्यात येणार आहे.गायन स्पर्धा प्रथमच तीन स्तरावरदरम्यान यावर्षापासून प्रथमच गायन स्पर्धा जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर होणार असल्याचे जी.एन. शिंपी यांनी सांगितले.बुधवारी दिवसभरात मैदानी स्पर्धा झाल्या. गुरुवारी नृत्य, फॅन्सी ड्रेस, नाटक व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवर आधारित स्पर्धा होणार आहे. तर १३ डिसेंबर रोजी या जिल्हास्तरीय महोत्सवाचा समारोप होऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत केले जाणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे