जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:20+5:302021-01-13T05:34:20+5:30

स्पर्धा शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या स्पर्धेचे नियोजन व कार्यवाही प्राचार्य ...

District level National Child Science Competition | जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान स्पर्धा

जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान स्पर्धा

स्पर्धा शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या स्पर्धेचे नियोजन व कार्यवाही प्राचार्य पी. व्ही. पाटील व प्राचार्य आर. बी. पाटील यांनी केले. स्पर्धेमध्ये एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयातून मोठ्या गटातून २२ विद्यार्थिनी व लहान गटातून १६ विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला. यातून जिल्हास्तरावरून विभाग स्तरासाठी मोठ्या गटातून नीलाक्षी जगदीश गिरासे, ममता भरत कदम, हर्षू लीलाधर लोहार, विशाखा शामसिंग वळवी, चैताली राजेंद्र चौधरी, योगिता प्रमोद धाकड, तसेच लहान गटातून श्रावणी नीलेश जडे, तेजस्विनी पंकज पाटील, योगाक्षी राहुलसिंग परदेशी यांची निवड झाली.

तसेच आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर येथून मोठ्या गटातून १० विद्यार्थी, लहान गटातून सहा विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. यातून मोठ्या गटातून दिग्विजय नानू पाटील, हर्षल प्रमोद सोनवणे यांची निवड झाली.

या स्पर्धेचे परीक्षण श्रीमती दीपाली दाभाडे व ललित कुलकर्णी (जिल्हा समन्वयक राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद धुळे) यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अटल को-ऑर्डिनेटर एन. ई. चौधरी, अटल इन्चार्ज बी. एस. महाजन, व्ही. डी. पाटील, सर्व विज्ञान व गणित शिक्षक, सर्व वर्गशिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Web Title: District level National Child Science Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.