कोरोना चाचण्यांमध्ये जिल्हा आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 11:19 IST2020-12-05T11:18:02+5:302020-12-05T11:19:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : कोरोना चाचणीमध्ये जिल्हा आघाडीवर असून राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त चाचण्या सध्या होत आहेत. ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना चाचणीमध्ये जिल्हा आघाडीवर असून राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त चाचण्या सध्या होत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्याला लोकसंख्येच्या दृष्टीने चाचण्यांचे उद्दिष्ट दिले असून आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना केली आहे.
लोकसंख्येनुसार जिल्ह्यासाठी ४८० चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र त्यापेक्षा दुप्पट चाचण्या जिल्ह्यात होत आहेत. सध्या सरासरी ९०० ते १२०० चाचण्या दररोज होत आहेत. राज्यातील बहुतेक जिल्ह्यात आरटीपीसीआर पेक्षा अँटीजेन चाचण्या अधिक होत होत्या. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
डिसेंबर मध्ये ६५ टक्के आरटीपीसीआर व ३५ टक्के अँटीजेन चाचण्या होणे अपेक्षित आहे. जानेवारी महिन्यात ७० तर फेब्रुवारी महिन्यात ७५ टक्क्यांपर्यंत आरटीपीसीआर चाचण्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
उद्दिष्टापेक्षा जास्त चाचण्या
जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. दररोज ४८० चाचण्या करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. त्यापेक्षा दुप्पट चाचण्या सध्या होत आहेत. ९०० ते १२०० यादरम्यान चाचण्या होत आहेत. जिल्ह्याच्या खाजगी व शासकीय रुग्णालयामध्ये आतापर्यंत ६१ हजार २१६ चाचण्या झाल्या असल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ.विशाल पाटील यांनी दिली.