जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या शतकाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 22:03 IST2020-06-05T22:03:09+5:302020-06-05T22:03:30+5:30
महाविद्यालयातील ८९ तर जिल्हा रूग्णालयातील ८ रूग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या शतकाकडे वाटचाल
धुळे : जिल्ह्यातील कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रूग्णांची संख्या लक्षणीय आहे. उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन रूग्ण घरी परतत आहेत. कोरोनामुक्त रूग्णांच्या शतकाकडे वाटचाल सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातील ९७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयात कोरोना बाधीतांवर उपचार सुरू आहेत. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाºया ८९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर जिल्हा रूग्णालयात उपचार घेतलेले ८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
धुळे शहरातील ७५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच शिंदखेडा तालुक्यातील सात, साक्री तालुक्यातील सात, शिरपूर तालुक्यातील सहा तर धुळे तालुक्यातील दोन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या शतकाकडे सुरू असलेली वाटचाल वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची पावती आहे. योग्य वेळी उपचार घेतले तर कोरोनावर सहज मात करणे शक्य असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. लक्षणे आढळली अथवा बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलात तर तात्काळ तपासणी करायला हवी.
कर्मचाºयांच्या मेहनतीची पावती
जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या शतकाकडे सुरू असलेली वाटचाल वैद्यकीय कर्मचाºयांच्या मेहनतीची पावती आहे. योग्य वेळी उपचार घेतले तर कोरोनावर सहज मात करणे शक्य असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. लक्षणे आढळली अथवा बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलात तर तात्काळ तपासणी करायला हवी, असे शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अति विशेष अधिकारी डॉ.दिपक शेजवळ यांनी सांगितले.
प्रशासकीय समन्वय महत्वाचे
आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणा यांच्या समन्वयामुळे कोरोनामुक्त रूग्णांच्या शतकाकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. विविध प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयामुळे संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल असा विश्वास वाटतो, असे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ.विशाल पाटील यांनी सांगितले.
२२ परप्रांतीय झाले कोरोनामुक्त
येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतलेले २२ परप्रांतीय बाधीत रूग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. धुळ्यानजीक वेगवेगळ्या अपघातात जखमी झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्यांमध्ये मालाड, भांडूप, दादर व उत्तर प्रदेशातील व्यक्तींचा समावेश आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून एकूण १०९ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत त्यामध्ये जिल्ह्यातील ९७ तर जिल्ह्याबाहेरील २२ रूग्णांचा समावेश आहे.