वर्षभरात मास्क न लावणाऱ्या १८ हजार जणांना २४ लाखांचा दंडधुळे जिल्हा : कोरोना पसरतोय, तरी बिनधास्तपणा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:35+5:302021-03-18T04:36:35+5:30
यावर्षी देखील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध कठोर केले असून पोलिंसानी कारवाई सुरु केली आहे. बिनधास्तपणा वाढला गेल्यावर्षी दिवाळीपासून कोरोनाचा ...

वर्षभरात मास्क न लावणाऱ्या १८ हजार जणांना २४ लाखांचा दंडधुळे जिल्हा : कोरोना पसरतोय, तरी बिनधास्तपणा कायम
यावर्षी देखील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध कठोर केले असून पोलिंसानी कारवाई सुरु केली आहे.
बिनधास्तपणा वाढला
गेल्यावर्षी दिवाळीपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे कोरोना विषाणू नष्ट झाल्याच्या अविर्भावात काहींचा बिनधास्तपणा वाढला आहे.
२०२१ मध्ये २५०० जणांना दंड
गेल्या वर्षी दिवाळीपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने कारवाई थंडावली होती. परंतु २०२१ मध्ये मार्च महिन्यापासून कोराेनाचा संसर्ग वाढल्याने पोलिसांनी कारवाईला पुन्हा सुरुवात केली आहे. यावर्षी आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या अडीच हजारापेक्षा अधिक नागरीकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
८० मंगल कार्यालयांची चाैकशी
वर्षभरात पोलिंसानी जिल्ह्यात ८० मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यात नियमांचे पालन केले नाही म्हणून साक्री येथील एक मंगल कार्यालय सील करण्यात आले. वेगवेगळ्या ७ व्यावसायिकांना दंड ठोठावला. अवैध दारु विक्रीचे १२२६ गुन्हे दाखल केले असून तब्बल २ कोटी ७ लाखांचा माल जप्त केला आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दररोज शेकडो रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह येत आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करावे. नियमीत मास्क वापरावा. अन्यथा कारवाई केली जाईल. - चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक
कोरोना नियंत्रणासाठीच्या कारवाया, दाखल गुन्हे
विनामास्क १८४८५
ट्रीपल सीट ९८३०
मंगल कार्यालये, हाॅल ०८