ज्येष्ठांना स्मार्टकार्डचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:33 IST2019-11-23T11:32:29+5:302019-11-23T11:33:12+5:30
उपक्रम : झोटवाडे, नवे कोडदे, शेंदवाडेच्या ग्रामस्थांना लाभ

Dhule
धुळे : राज्य परिवहन महामंडळाने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टकार्ड योजना सुरू केली आहे. हे कार्ड घेण्यासाठी ज्येष्ठांना दोंडाईचा येथे जाणे शक्य नाही. त्यामुळे शिवेसनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे व धमाणे गट प्रमुख गणेश भदाणे यांनी गाव जागृत अभियांनातर्गत गावोगावी जाऊन ज्येष्ठांना स्मार्टकार्डचे वाटप केले.
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम झाला.
ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्डसाठी आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. त्यानंतर शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते झोटवाडे, नवे कोडदे, शेंदवाडे, दाऊळ व मंदाणे येथे स्वत: जाऊन लाभाथीर्ना वाटप करण्यात आले त्यावेळी शिवसेना गट प्रमुख गणेश भदाणे, बापु देसले ,ज्ञानेश्वर माळी,हेमंत पाटील,विक्की पाटील, देविदास कांबळे,अजय पवार, रवींद्र कोळी, सचिन चव्हाण,वाल्मिकी कोळी, अजय पवारसह लाभार्थी जेष्ठ नागरिक उपस्थित होते. स्मार्टकार्ड मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.