दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:33+5:302021-04-24T04:36:33+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या आदेशान्वये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या प्रतिभा भावसार, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार ...

दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या आदेशान्वये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या प्रतिभा भावसार, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या सूचनेनुसार धुळे तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे मोजमाप शिबिर घेण्यात आले होते. यावेळी ट्रायसिकल-०५, व्हिलचेअर १४, क्रेचेस-०४,
रोलेटर ३३, ब्रेलकिट ०१, सी.पी चेअर २६, डेझी प्लेअर ०१,श्रवणयंत्र १३
श्रवणयंत्र बॅटरी ८४ असे साहित्य वाटप करण्यात आले. हे साहित्य गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, तसेच गटसमन्वयक भारती भामरे व जिल्हा समन्वयक भीमराव देवरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. साहित्य वाटपासाठी समावेशित शिक्षण विभागाचे विषयतज्ज्ञ अमरदीप वानखेडकर , प्रतिभा अहिरे तसेच विशेष शिक्षक नम्रता सोनवणे,नेहा जाधव,शीतल पाटील,नीलिमा चव्हाण व वरिष्ठ विषय साधनव्यक्ती किशोर सोनवणे, सुनील देवरे यांनी परिश्रम घेतले.