१८० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:33 IST2019-07-31T21:33:38+5:302019-07-31T21:33:54+5:30
मनुश्री प्रतिष्ठानचा उपक्रम : दहावी, बारावीतील गुणवंतासह ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार

गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करतांना चंद्रकांत सोनार. सोबत डावीकडून सुनील देवरे, जगदीश देवपूरकर, हर्षल विभांडीक आदी.
धुळे : शहरातील मनुश्री प्रतिष्ठान, जन्मबंध गृप, खान्देश विद्यार्थी संघटना धुळे यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच १८० विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला.
कमलाबाई कन्या शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश देवपूरकर होते. कार्यक्रमाचे उदघाटन महापौर चंद्रकांत सोनार यांच्याहस्ते झाले. व्यासपीठावर पराग अहिरे, आनंद तायडे, कविता सोनार, सुनील देवरे, भुषण घाडगे, चंद्रकांत पोतदार, हर्षल विभांडीक उपस्थित होते.
कार्यक्रमात दहावी, बारावीतील ५५ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, विविध क्षेत्रातील ४१ नागरिकांचा सन्मान प्राचार्य कल्पना वाघ, नगरसेविका सुरेखा उगले, गिरीश चौधरी, अनिल पोतदार यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात १८० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नग याप्रमाणे मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.याप्रसंगी डॉ. अभिनय दरवडे, हर्षल विभांडीक, पराग अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाला संतोष मंडोरे, डॉ. प्रशांत साळुंखे, नगरसेविका सुरेखा उगले, जमनादास सोनार, पारस देवपूरकर, विजयानंद मोरे,उमेश चौधरी, राजेंद्र जाधव, नितीन वानखेडे, प्रमोद मुंडके, दीपक वारकर, प्राचार्य किरण पोतदार, राकेश रणधीर, संजय जगताप, वसंत वाघ, राजेश सोनार, रवीराज चव्हाण, सुनील विसपुते आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश बाविस्कर, महेंद्र सोनार, विजय बाविस्कर, रवीराज चव्हाण, अनिल पिंगळे, माधव विसपुते, गिरीश मोरे, प्रितेश बाविस्कर, प्रशांत सोनार, अनिल विसपुते, किशोर भामरे, कोमल पोतदार, सचिन दाभाडे, सुनील मोरे, अमोल दुसाने आदींनी परिश्रम घेतले.