अंतुर्ली गावात गरजुंना अन्नधान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 21:31 IST2020-04-17T21:31:01+5:302020-04-17T21:31:32+5:30
कोरोना इफेक्ट : हिना गावीत यांच्या हस्ते

अंतुर्ली गावात गरजुंना अन्नधान्य वाटप
शिरपूर : तालुक्यातील अंतुर्ली गावात डॉ. हिना गावीत युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून आवलमाता मत्स्य व्यवसाय सहकारी संथेच्यावतीने गावातील गरजु ५० क्रियाशील सभासदांना अन्नधान्य वाटप केले़
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे़ त्यामुळे अन्नधान्य वाटप केले़
यावेळी फाऊडेशनचे निमंत्रक प्रविण शिरसाठ, मार्केट कमिटीचे उपसभापती ईशेंद्र कोळी, जिल्हापरीषद सदस्य भीमराव कोळी, शिंदखेडा पं.स.सदस्य दिपक मोरे, अमराळे सरपंच ताथ्या गिरासे, संस्थेचे सचिव विठ्ठल भिल, दत्तात्रय कोळी, उखा कोळी आदी उपस्थित होते़