जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३२४ कोटींचे पीककर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:15+5:302021-08-17T04:41:15+5:30

भांडवलाची उपलब्धता व्हावी म्हणून धुळे जिल्ह्यासाठी ६८४ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ३३ हजार ६२१ ...

Distribution of crop loan of Rs. 324 crore to farmers in the district | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३२४ कोटींचे पीककर्जवाटप

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३२४ कोटींचे पीककर्जवाटप

भांडवलाची उपलब्धता व्हावी म्हणून धुळे जिल्ह्यासाठी ६८४ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ३३ हजार ६२१ सभासदांना ३२४ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित झाले आहे, तर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४४ हजार ८४७ शेतकऱ्यांना ३४० कोटी ८१

लाख रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिका आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे (निवडणूक), गोविंद दाणेज (रोहयो), सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी आदींसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणार्पण केले. त्यांच्या बलिदानामुळे भारत देश स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात होत आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी ही मोठी अतुलनीय बाब ठरणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिली आहे. ऑगस्टचे पहिले १५ दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, पाऊस रुसलाच आहे. असेच चित्र राहिले, तर नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची चिन्हे आहेत. मात्र शेतकरी, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकरी आणि

नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व राहील.

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या दक्षतेमुळे बेड, ऑक्सिजन, औषधे कमी पडली नाहीत. पोलीस यंत्रणेचे बळकटीकरण केले. त्यांना २२ वाहने उपलब्ध करून दिले. हे सर्व सुरू असताना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले. आतापर्यंत पाच लाखांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट येणार आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करावे, नियमितपणे मास्क वापरावा. असे झाले, तर निश्चितच आपला जिल्हा कोरोना विषाणूमुक्त राहील.

ऑक्सिजन प्रकल्प निर्मिती जिल्ह्यात द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्पांची नियोजित संख्या सात असून त्यापैकी दोन प्रकल्प अस्तित्वात आहेत. त्यांची क्षमता २१ केएल एवढी आहे. उर्वरित पाच प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून त्यांची क्षमता ७८ केएल एवढी आहे. जिल्ह्यात पीएसए प्रकल्पांची संख्या १८ आहे. त्यापैकी पाच प्रकल्प साकार झाले

असून उर्वरित १३ प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही मिळून १५.६३ टन एवढी क्षमता आहे. जगदीश देवपूरकर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Distribution of crop loan of Rs. 324 crore to farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.