पाचशे मुलांना पुस्तकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:17 IST2019-11-20T23:16:25+5:302019-11-20T23:17:23+5:30
धुळे : स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती महापालिका शिक्षण मंडळाच्यावतीने मराठी माध्यमाचे १५० ...

Dhule
धुळे : स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती महापालिका शिक्षण मंडळाच्यावतीने मराठी माध्यमाचे १५० तर उर्दू माध्यमाच्या २५० मुलांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़
मनपात राष्ट्रीय शिक्षण दिवस व बालदिन साजरा झाला़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख सहा. आयुक्त शांताराम गोसावी, विरोधी पक्षनेता साबीर शेख, नगरसेवक भिकन वराडे, नागसेन बोरसे, शब्बीर पिंजारी, प्रा. डॉ. अशपाक शिकलगर, नगरसचिव मनोज वाघ, अनिल साळुके आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक महेंद्र जोशी यांनी केले तर विषयशिक्षक महेमुद व उपशिक्षिका रुपाली मनिखेडकर यांनी महापुरूषांच्या जीवनाविषयी माहिती दिली़ यावेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका रत्ना गुजर यांचा आयुक्त शेख यांच्या हस्ते झाला़ यशस्वीतेसाठी शरद पवार, सुभाष पाटील, रियाज, सागर मोरे, शरीफ, तुषार वाणी, राणे, विद्या मोरे, वसीमराजा आदींनी प्रयत्न केले.