धुळ्यात रॅलीतून दिला व्यसनमुक्तीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 15:34 IST2018-03-05T15:34:32+5:302018-03-05T15:34:32+5:30
उपक्रम : मनपा शाळा क्रमांक ९ च्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

धुळ्यात रॅलीतून दिला व्यसनमुक्तीचा संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील मनपा शाळा क्रमांक ९ च्या विद्यार्थ्यांनी सोमवारी रॅली काढत व्यसनांपासून दूर रहावे, असा संदेश दिला. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत गुटखा व कचरा संकलित करून त्याची होळी करण्यात आली.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, नेहरू युवा मंडळ, म्हसाळे, छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था, बिलाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी यावेळी हिंदू एकता आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष हिरामण गवळी, मुख्याध्यापिका इंदिरा भोसले, उज्ज्वल बोरसे, पवन शंखपाळ, जिल्हा समन्वयक पंकज शिंदे, राजेंद्र माळी उपस्थित होते.
घोषणांद्वारे केली जनजागृती
मनपा शाळा क्रमांक ९ येथून रॅलीला सुरुवात झाली. पुढे ही रॅली गल्ली क्रमांक ५, भांडे गल्ली, पारोळा रोड, पवनपुत्र विजय व्यायामशाळा मार्गे मनपा शाळा क्रमांक ९ येथे आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘गुटखा खाऊ नका’, ‘व्यसनांपासून दूर रहा’ यांसारख्या घोषणा देत येथील परिसर दुमदुमून सोडला.