लसीकरण केंद्रावर वाद, ऑनलाइन नोंदणीमुळे उडाला गोंधळ : शहरातून लसीकरणासाठी आलेल्या तरुणांना मज्जाव, कापडणे केंद्रावर पोलीस बंदोबस्तात लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST2021-05-07T04:37:44+5:302021-05-07T04:37:44+5:30
न्याहळोद आणि नगाव येथेही वाद - न्याहळोद आणि नगाव येथील आरोग्य केंद्रावरही याच विषयावरून वाद निर्माण झाला. याठिकाणी तालुका ...

लसीकरण केंद्रावर वाद, ऑनलाइन नोंदणीमुळे उडाला गोंधळ : शहरातून लसीकरणासाठी आलेल्या तरुणांना मज्जाव, कापडणे केंद्रावर पोलीस बंदोबस्तात लसीकरण सुरू
न्याहळोद आणि नगाव येथेही वाद - न्याहळोद आणि नगाव येथील आरोग्य केंद्रावरही याच विषयावरून वाद निर्माण झाला. याठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी तरन्नूम पटेल यांनी येऊन ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय लस देता येणार नाही, असे सांगितले. तेव्हा उपस्थित नागरिकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला. शेवटी उपस्थित लोकांची नोंदणी करवून त्यांनाही नंतर लस देण्यात येईल, असे सांगितल्यानंतर लोक शांत झाले आणि लसीकरणास सुरुवात झाली.
प्रतिक्रिया- प्राथमिक आरोग्य केंद्र कापडणे वैद्यकीय अधिकारी व्ही. पी. नागे
18 ते 14 वयोगटातील ग्रामस्थांनी covid-19 च्या प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन कापडणे गावासह धुळे व परिसरातील गावांतील ग्रामस्थांनी केले आहे; परंतु लसीकरणाच्या दिवशी शेकडोच्या संख्येने आरोग्य केंद्रात गर्दी झाल्यावर स्थानिकांनी सरसकट लसीकरण करण्यास विरोध केला. कापडणे गावकरी सांगतात, केवळ कापडण्यातील ग्रामस्थांना लसीकरण करा; परंतु ऑनलाइन रजिस्ट्रेशन ज्या लोकांनी केले असेल त्या लोकांना टोकन देऊन त्याप्रमाणे लसीकरण केले जात आहे; परंतु ते स्थानिकांना मान्य नाही. नागरिकांनी भांडण-तंटे करत अखेर ग्रामस्थांनी दोन ते तीन तासांपर्यंत लसीकरण बंद पाडले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सोनगिर पोलिसांना पाचारण करून यातून मार्ग काढून स्थानिकांना प्राधान्य देऊन व बाहेर गावांतील आलेल्या ग्रामस्थांच्या वेगळ्या रांगा करून लसीकरण करण्यास सुरुवात केली.
प्रतिक्रिया विलास संभाजी पाटील ग्रामस्थ, कापडणे -
कापडणे गावातील ग्रामस्थांना लसीकरणासाठी प्राधान्य न देता धुळे शहरातील आलेल्या लोकांसाठी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना लसीकरण करण्यास आरोग्य कर्मचारी मुभा देतात गावकऱ्यांना लसीकरणाचा डोस न देता माघारी पाठविले जात आहे. हा अन्याय आरोग्य विभागाने बंद करावा व स्थानिकांना प्राधान्य द्यावे.