विजवितरण कंपनीच्या आडमुठे धोरणाने शिंदखेडा येथे सकाळपासून विज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:51 IST2019-07-30T15:51:01+5:302019-07-30T15:51:18+5:30
सखोल चौकशी होऊन संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी

dhule
शिंदखेडा :- शिंदखेडा तहसील कार्यालयाचे वीज बिल थकीत असल्याने सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज कनेक्शन कट करण्यात आले़ तहसीलदारांच्या आदेशाने सर्कल पंडित दावळे, तलाठी सुरेश बाविस्कर यांनी वीज वितरण कंपनीकडे जमीन महसुलाची मागणी नोटीस संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना ३ आॅगस्ट २०१८ बजावल्यानंतर देखील भरणा केला नसल्याने सोमवारी सकाळी विजवितरण कंपनीचे सबस्टेशन सील करण्यात आले़
तहसील कार्यालयाचे वीज कनेक्शन खंडित केल्याने जिल्हा परिषद व विधान सभेच्या निवडणुकीचे कामकाज, विद्यार्थ्यांचे दाखले,इ शेतकरी पीक विम्याची मुदत एक दिवस वाढल्याने तेही ठप्प झाले आहे़
तहसील काचेरीचे वीज बिल दोन महिन्यांपासून ९८ हजार ७२० रुपये थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आली़ नोटीस न देता वीज पुरवठा खंडित केला या बाबत तहसीलदार यांनी सदर बिल टेझरीत दिले आहे़ बुधवार पर्यत सदरील रकमेचा धनादेश वीज वितरण कंपनी मिळेल असे तहसील कर्मचाºयांनी विज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांना सांगितले होते़ मात्र तरी देखील विज पुरवठा खंडित करण्यात आला़ त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील सर्व बँका, शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले होते़ या नुकसानीला जबाबदार कोण याची सखोल चौकशी होऊन संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे़