लाॅकडाऊननंतर पुन्हा शिस्त बिघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:33+5:302021-03-18T04:36:33+5:30
तीन दिवसाचा कर्फ्यू संपल्यानंतर बुधवारी पहाटे सहा वाजेपासून शहरातील व्यवहार पूर्ववत सुरु झाले.तीन दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येने नवीन उच्चांक ...

लाॅकडाऊननंतर पुन्हा शिस्त बिघडली
तीन दिवसाचा कर्फ्यू संपल्यानंतर बुधवारी पहाटे सहा वाजेपासून शहरातील व्यवहार पूर्ववत सुरु झाले.तीन दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येने नवीन उच्चांक गाठल्याने धुळेकर आतातरी गर्दी करणार नाही. कोविड नियमांचे पालन करणार असग वाटत होते. पण झाले याच्या उलट धुळेकरांना तर कोरोनाचा विसरच पडला. सर्व धुळेकर बाजारहाट करण्यासाठी मोठ्यासंख्येने बाहेर पडले. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदील परिसरात गर्दी केली.
मनपाची कारवाई नाहीच
विना मास्क फिरणारे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे दुकानदार व नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाकडून लाॅकडाऊन काळात कारवाई करण्यात आली. मात्र बुधवारी व्यापारी व नागरिकांकडून कोणतेही नियम पाळले जात नसतांना महापालिका अतिक्रमण निमुर्लन विभागाकडून कारवाई होतांना आली नाही.
फेरीवाले व विक्रेते बिनधास्त
आग्रारोडवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आग्रारोडवर बुधवारी नेहमी प्रमाणे गजबजलेला दिसून आला. येथील हातगाडी व फेरीवाले विक्रेत्यांनी पोलिसांकडून कारवाई होऊ नये, यासाठी नावालाच मास्क लावलेला दिसून आला. तर काहींनी कारवाईचं होत नाही. म्हणून दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
रिक्षाचालकांवर कारवाई कधी
कोरोनाचा संर्सग टाळण्यासाठी रिक्षा चालकांना प्रवांशी संख्या कमी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतांना बुधवारी अनेक रिक्षांमध्ये प्रवाशी संख्या प्रमाणापेक्षा अधिक होती. त्यातही काही विनामास्क दिसून आले होते.
मनपाचे कर्मचारीही विनामास्क
मनपाकडून एकीकडे नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असतांना दुसरीकडे मनपाच्या जुन्या इमारतील बांधकाम, कर तसेच अन्य विभागातील मनपाचे कर्मचारी विना मास्क कार्यालयात काम करतांना दिसून आले. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी मनपाने कर्मचाऱ्यांनाही शिस्त लावण्याची गरज आहे.
मनपा लसीकरण केंद्रातील बंद
मनपा जुन्या इमारतीत कोरोना लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे. मात्र लसीकरण केंद्रातील तीन कर्मचारी कोरोना बाधित निघाल्याने काही दिवसांसाठी येथील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. याबाबत आरोग्य अधिकारी डाॅ. मोरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शिंगाव्यातील काेविड सेंटर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट
महानगरासह जिल्हातही कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून कोविड सेंटरव्दारे कोरोना बाधितांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संवाद साधून नियोजना संदर्भात चर्चा केली.