भावजयीशी दिराने केला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST2021-03-16T04:35:38+5:302021-03-16T04:35:38+5:30

शिंदखेडा तालुक्यातील तामथेर येथील पूनम दिलीपसिंग गिरासे हिचा विवाह टेंभे (ता. शिरपूर) येथील कैलास विजयसिंग राजपूत ...

Dira married Bhavjayi | भावजयीशी दिराने केला विवाह

भावजयीशी दिराने केला विवाह

शिंदखेडा तालुक्यातील तामथेर येथील पूनम दिलीपसिंग गिरासे हिचा विवाह टेंभे (ता. शिरपूर) येथील कैलास विजयसिंग राजपूत यांच्याशी झाला होता. मात्र, लग्न झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यांतच पूनमचे पती कैलास यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे घरात काही महिन्यांपूर्वीच आलेल्या सुनेचे कसे होईल या विवंचनेत सासू-सासरे, तर इकडे माहेरची मंडळी चिंतेत होती. अखेर मेहुणे सुरेश गिरासे यांनी पूनमचा लहान दीर संदीप राजपूत याच्याजवळ पूनमशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्याचबरोबर पूनमसह तिचे आई-वडील, सासू-सासरे यांनाही हा विषय सांगितला. पूनम व संदीप यांच्या विवाहाला नातेवाइकांनी होकार दिला. तसेच पूनम व संदीप यांनीही याला संमती दिली. त्यामुळे या दोघांचा विवाह साळवे येथील पेडकाई देवी मंदिरात मोजक्याच नातेवाइकांच्या साक्षीने पार पडला. राजपूत समाजात हा आदर्श विवाह ठरलेला आहे.

Web Title: Dira married Bhavjayi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.