शिरपुरात कर्तबगार महिलांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:03 IST2020-03-11T13:02:56+5:302020-03-11T13:03:21+5:30
जागतिक महिला दिन : तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : जागतिक महिला दिनानिमित्त येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयात राहुल रंधे फाऊंडेशनमार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्या सिमा रंधे, महाराष्ट्र ग्रंथालय कमेटीच्या अध्यक्षा सारीका रंधे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे उपस्थित होते.
सारीका रंधे, सिमा रंधे यांनी समाजातील विविध क्षेत्रातील महिलांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती सांगितली. तसेच अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात. अशा विघातक प्रवृत्तीला लढा देण्यासाठी महिलांनी खंबीर झाले पाहिजे. मुलांच्या संगोपनापासून तर देशाचा कारभार पाहण्यापर्यंत सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत. भावी पिढी सुसंस्कारित, बलशाली होण्यासाठी महिलांचे कार्य अतुलनीय आहे. स्रीभृणहत्या, हुंडाबळी, अत्याचार याबाबतीत महिलांनीच एकत्र येऊन या प्रवृत्तीला आळा घालायला हवा, असे प्रतिपादन केले.
जि़प़ अध्यक्ष डॉ.तुषार रंधे म्हणाले, प्राचीन काळापासून समाजाच्या जडणघडणीत स्रियांचा सिंहाचा वाटा आहे. आज तर शेतीपासुन अंतराळापर्यंत सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. समाजाने महिलांचा आदर केला पाहिजे.
यावेळी पं.स. सदस्या विनिता पाटील, अॅड.शालिनी सोनवणे, डॉ.वृषाली बडगुजर, डॉ.सोनाली बोडखे, अॅड.वैशाली धोबी, वाहतुक निरिक्षक प्रिती पाटील, एस.टी.वाहक उमा पवार, पोलिस स्वाती शहा, डॉ.जया जाने, वाडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पुनम बडगुजर, नगरसेविका मोनिका शेटे, आदर्श पुरस्कारप्राप्त मंगला पाटील, तलाठी रेणुका राजपुत, अनिता काळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल रंधे फाऊंडेशनचे निलेश महाजन, गजु पाटील, शेखर माळी, प्रविण पाटील यांनी परिश्रम घेतलेत़ सुत्रसंचालन गजु पाटील यांनी केले.
वाल्मिक नगरात महिला दिन
शिरपूर शहरातील वाल्मिक नगरातील वाल्मिक भवनात राणी झलकारीबाई महिला मंडळातर्फे महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लिला अंतुर्लीकर, माजी जि़प़ सदस्या सिमा रंधे, सारिका रंधे, कविता कोळी, विजया ईशी, अरुणा शिरसाठ, अॅड़शालिनी सोनवणे, सुवर्णा अंतुर्लीकर आदी उपस्थित होत्या. सारिका रंधे यांनी महिला दिनानिमित्त स्री जीवनावर कविता सादर केली़ अनुपमा तवर यांनी मार्गदर्शन केले़ यानंतर रांगोळी स्पर्धेतील विजेत्या महिलांचा गौरव करण्यात आला़ तसेच मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला़ सुरूवातीला मनिषा मगरे, सुनिता बागुल, रेखा देवरे, मनिषा सोनवणे यांनी ईशवस्तन व स्वागतगीत सादर केले. सुत्रसंचालन सुनिता बागुल व मनिषा सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक मनिषा मगरे यांनी केले. आभार रेखा मगरे यांनी मानले़ कार्यक्रमासाठी मनिषा मगरे, सुनिता बागुल, रेखा देवरे, मनिषा सोनवणे, सोनाली अखडमल, शिला साळुंखे, सुवर्णा अंतुर्लीकर, संगिता जाधव, संगिता सावळे, प्रमिला मुडावदकर, शोभा वाकडे, अरुणा शिरसाठ, कल्पना सुर्यवंशी, अनिता कुवर, सरला सावळे, अनिता जाधव, छाया शिरसाठ, कल्पना निकुंभ यांनी परिश्रम घेतले़
डॉ़जळगांववाला यांचे व्याख्यान
महिला सशक्तीकरण, ब्रिडींग द गॅप या विषयावर समाजसेविका डॉ़तस्रीम जळगांववाला यांचे व्याख्यान झाले.
येथील ब्रम्हटेक भागातील गुजराथी समाज मंगल कार्यालयात हा व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी संगीता गुजराथी, भावना गुजराथी, तृप्ती गुजराथी, दीपाली गुजराथी, निता गुजराथी, लता गुजराथी, नुतन गुजराथी, डिंपल गुजराथी, रूपल गुजराथी तसेच श्रीनाथजी महिला मंडळ, विसालाड मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़