मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातामध्ये वाढले मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST2021-06-26T04:24:59+5:302021-06-26T04:24:59+5:30
कोरोनाचा काळ हा जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला होता़ टप्प्या-टप्प्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र ...

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातामध्ये वाढले मृत्यू!
कोरोनाचा काळ हा जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला होता़ टप्प्या-टप्प्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून काही निर्बंध लावले गेले़ त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने रस्त्यावरची वर्दळ थांबली़ धावणारे महामार्गदेखील थांबले़ शहरातील गर्दी कमी झाल्याने अपघाताच्या संख्येत घट झाली़ जे काही अपघात झाले ते अगदी बोटावर मोजण्याइतकेच झाले़
आता कोरोनाचा काळ तसा संपुष्टात आलेला आहे़ कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाकडून लावलेले निर्बंधदेखील बऱ्याच प्रमाणावर हटविण्यात आलेले आहेत़ रस्त्यावरील वर्दळ पुन्हा वाढल्याने अपघाताची मालिका पुन्हा सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़
लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी; पण...
- कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर रस्त्यावरची वर्दळ हटविण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते़ त्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला़ परिणामी, वर्दळ थांबल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात घट झाली़
- अपघातदेखील कमी झाले असले तरी कोरोनाचा त्रास मात्र अनेकांना असह्य करून गेला़ त्यात काही जणांनी स्वत:ला सावरले तर काही जणांनी आपला प्राण त्यागला़ अपघात आणि कोरोना हे एकसारखे ठरले़
पायी चालणाऱ्या
व्यक्तींनाही धोका
- कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळी अपघात होईल हे आजच्या या धावपळीच्या जगात कोणीही सांगू शकत नाही़ अगदी आपण पायी चालत असताना आपल्या पाठीमागून वेगाने येणारे वाहन आपल्याला धडकून केव्हा निघून जाईल, हे कोणीही सांगू शकत नाही़
मृतांमध्ये सर्वाधिक
तरुणांचा समावेश
- वाहने अतिशय वेगाने चालविणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश आहे़ हे कोणीही नाकारू शकत नाही़ शहरात आणि महामार्गावर त्यांचे वेगाने वाहन चालविण्याचे प्रमाण बऱ्यापैकी म्हणावे लागेल़ त्यांच्यामुळे अपघात इतका मोठा होता की अक्षरश: स्वत:चा अथवा दुसऱ्याचा जीव घेतो़
वेळ मौल्यवान; पण जीवन अमूल्य
- वाहन चालविताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी़ आपल्यामुळे स्वत:ला आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही याकडे देखील गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे़
-केतन चौधरी
- शहरात प्रत्येकाने वाहन हे वेगाची मर्यादा सांभाळून चालविण्याची गरज आहे; पण महामार्गाप्रमाणे वाहने वेगाने चालविली जातात़ अपघाताला वेग हेच कारण म्हणावे लागेल़
-महेश सोनवणे