४४ विद्यार्थिनींना हिरक पंख पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 22:38 IST2020-07-16T22:37:48+5:302020-07-16T22:38:02+5:30

दोंडाईचा : राज्य स्काऊट-गाईडतर्फे आयोजित परीक्षेत मिळविले यश

Diamond Feather Award to 44 students | ४४ विद्यार्थिनींना हिरक पंख पुरस्कार

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : हस्ती चँरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅँड ज्यु. काँलेज दोंडाईचा येथील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाइड संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तर हिरक पंख पुरस्कार निवड चाचणी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. ही परीक्षा २२ ते २४ फेब्रुवारी २०२० दरम्यान हस्ती बहुउद्देशिय सांस्कृतिक भवन दोंडाईचा येथे झाली. तिचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात हस्तीचे एकुण ४६ बुलबुल राज्य पुरस्कारासाठी पात्र ठरले.
या सर्व पात्र विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्याचे राज्य मुख्य आयुक्त यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व बँज प्राप्त होणार आहे.
यात विमला राजपूत, आरूषी पाटील, हेतल पाटील, उज्ज्वला पारधी, गुंजन माळी, हेमांगी माळी, त्रदिशा गुजराथी, अक्षरा गुजराथी, प्रेरणा गिरासे, कृतिका बागुल, श्रद्धा सुर्यवंशी, चाणाक्षी सिसोदिया, वैभवी सावळे, समृद्धी श्राफ, प्रणाली पाटिल, अनुष्का नेरकर, मनस्वी लखोटिया, सायली जयस्वाल, मयुरी चौरे, गायत्री बहिरम, धनश्री सुर्यवंशी, आयुषी सनेर, रजनी परमार, टिना खांडेकर, भावी जैन, वैष्णवी जाधव, सारीका गिरासे, दिपश्री गिरासे, कशिष देसले, मानसी राजपूत, रियांशिका राठोड, यशश्री रगडे, हेतल पवार, सृष्टी पाटील, अक्षरा देवरे, झैनब बोहरी, योशिता बागल, यती अग्रवाल, आकांक्षा अग्रवाल, उन्नती रावल, मयुरी पाटील, सेहरा करीमजी, अर्पिता इंदाणी, दिग्विजय गिरासे, साईशा सोनवणे, प्राची खंडेराव या विद्यार्थिनींचा समावेश आहे.
यशस्वी बुलबुल विद्यार्थिनींचे हस्ती स्कूल स्काउट गाइड विभाग प्रमुख किशोर गुरव, स्काउट मास्टर प्रवीण गुरव, नरेश सावंत व फ्लॉक लिडर पुष्पा साळवे, दिव्या गुरव, मनिषा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तर शालेय समिती चेअरमन कैलास जैन, सदस्य डॉ. विजय नामजोशी व प्राचार्य हरिकृष्ण निगम यांनी कौतुक केले.

Web Title: Diamond Feather Award to 44 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.