विधायक समितीच्या अध्यक्षपदाची धुरा बोळे यांच्याकडे, तर सचिव महेंद्र गांगुर्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:34 IST2021-03-19T04:34:57+5:302021-03-19T04:34:57+5:30
येथील विधायक समिती पिंपळनेर संचलित कै. नानासाहेब साहेबराव पंडित पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर या संस्थेचा कार्यकारिणी ...

विधायक समितीच्या अध्यक्षपदाची धुरा बोळे यांच्याकडे, तर सचिव महेंद्र गांगुर्डे
येथील विधायक समिती पिंपळनेर संचलित कै. नानासाहेब साहेबराव पंडित पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर या संस्थेचा कार्यकारिणी याबाबतचा वाद सहायक धर्मादाय आयुक्त धुळे यांचे न्यायालयात सुरू होता त्यामध्ये संजय शंकर जगताप (रा. चिकसे) यांचा फेरफार अर्ज ४ दाखल होता, तर अध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कमलाकर शंकर बोळे यांचा फेरफार अर्जात संपूर्ण कामकाज विधायक समितीचे सचिव महेंद्र रामराव गांगुर्डे हे संस्थेच्या वतीने कामकाज पाहत होते. दि. २९ जानेवारी रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त धुळे यांनी संजय जगताप यांचा फेरफार अर्ज फेटाळला. कमलाकर शंकर बोळे व संस्थेचे सचिव महेंद्र रामराव गांगुर्डे यांचा फेरफार अर्ज सहायक धर्मादाय आयुक्त यांनी मंजूर केला आहे. संस्थेच्या वतीने ॲड. प्रमोद व्ही. दीक्षित यांनी कामकाज पाहिले.
तर संस्थेचे अध्यक्ष कमलाकर बोळे व सचिव महेंद्र गांगुर्डे व संचालक मंडळ यांचे मुख्याध्यापक बी. एल. चव्हाण व उपमुख्याध्यापक उमेश पाटील यांनी स्वागत केले.