धुळ्यात भारत बंदला लागले हिंसक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 14:02 IST2020-01-29T14:01:51+5:302020-01-29T14:02:52+5:30
दोन दुचाकी जाळल्या : अज्ञातांनी केली दगडफेक

धुळ्यात भारत बंदला लागले हिंसक वळण
आॅनलाइन लोकमत
धुळे :सीएए व एनआरसी कायद्याच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला धुळे शहरात हिंसक वळण लागले. शहरातील शंभरफुटी रस्त्यावर दुचाकी जाळून दगडफेक करण्यात आली. तर ८० फुटी रस्त्यावरही दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दगडफेक करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
सीएए कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे बुधवारी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
धुळ्यात सकाळी १० वाजेपर्यंत जनजीवन सुरळीत सुरू होते. मात्र ११ वाजेनंतर तणाव वाढण्यास सुरूवात झाली. बंदकर्त्यांनी चाळीसगाव रोड चौफुलीवर मुरूम टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण केला. तसेच चाळीसगाव चौफुली रोडवर असलेल्या १०० फुटी रस्त्यावर अज्ञातांनी दोन दुचाकी जाळल्या आहेत. तसेच काही हातगाड्याही उलटवून दिलेल्या आहेत. शहरातील ८० फुटी रस्त्यावरही काहींनी दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे.
बंदला हिंसक वळण लागल्याने, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. शहरातील साक्रीरोडवरही काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. शहरातील अकबर चौक, भंगार बाजार परिसर, चाळीसगाव चौफुली, १०० फुटी रोड, ८० फुटी रस्त्यावरील सर्व दुकाने बंद असून, याभागात कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे.
शहरातील दोन-तीन भाग वगळता जुना ्र आग्रारोड, पारोळा रोड, मुख्य बाजारपेठेत व्यवहार सुरळीत सुरू आहे.