धुळ्याच्या ‘झेड़ बी़ पाटील’ महाविद्यालयाला सांघिक पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 22:30 IST2019-10-04T22:30:14+5:302019-10-04T22:30:49+5:30
विद्यापीठस्तरीय वकृत्व स्पर्धा : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य, विद्यार्थ्यांचा सहभाग

धुळ्याच्या ‘झेड़ बी़ पाटील’ महाविद्यालयाला सांघिक पारितोषिक
धुळे : येथील जयहिंद शैक्षणिक संस्था धुळे संचालित झेड.बी.पाटील महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत गुरूवारी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी एक स्वच्छता दूत’ याविषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठस्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे सांघिक पारितोषिक झेड.बी.पाटील महाविद्यालयाने मिळविले.
स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी. एच. पवार यांच्या अध्यक्षतेखाली जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या संचालिका डॉ.नीलिमा पाटील यांच्या हस्ते झाले. दिवसभरात गांधीजींच्या विचारांचा जागर करीत विद्यार्थ्यांनी आपल्या अनोख्या शैलीतून गांधीजींचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेत १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सायंकाळी प्रमुख पाहुणे डॉ.दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी चेअरमनडॉ.अरुण साळुंके होते. व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रमोद पाटील, महाविद्यालय विकास समिती चेअरमन प्रा.सुधीर पाटील होते. यावेळी बोलतांना डॉ. दिलीप पाटील म्हणाले की, भारत आणि संपूर्ण जगात आज गांधीजींच्या विचारांचे चिंतन आणि आचारण मोठ्या प्रमाणात होत आहे. जगाच्या विकासासाठी तसेच माणसाच्या मन शांततेसाठी लागणाºया बाह्य स्वच्छतेबरोबरच आंतरिक स्वच्छता साधण्यासाठी महात्मा गांधीं विचार आचरण काळाची गरज आहे. रमेश दाणे म्हणाले की गांधीजींनी सत्यालाच ईश्वर मानले होते. आज जगाने देखीला गांधीजींच्या शांती आणि अहिंसेच्या विचारांचे पाईक होत त्यांच्या पदपथावर चालण्यास सुरवात केली आहे. डॉ.अरुण साळुंके म्हणाले की, महात्मा गांधींनी आपल्या विचार आणि लिखाणाव्दारे पारतंत्र्यात असलेल्या भारतीय समाजात प्रेरणा निर्माण केली. आज जगात महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर होत आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून रमेश दाणे, प्रा.डॉ. मृदुला वर्मा, प्रा. डॉ. वर्षा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री पाटील, पारितोषिक वाचन प्रा.डॉ.प्रविणसिंग गिरासे यांनी तर े आभार वक्तृत्व व वादविवाद मंडळ संयोजक प्रा.पंडित गायकवाड यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते असे
सांघिक पारितोषिक-झेड.बी पाटील महाविद्यालय धुळे.वैयक्तीक पारितोषिक- प्रथम-नमिता पाटील (आर.सी.पटेल इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी शिरपूर), व्दितीय- लीना पाटील, (वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा), तृतीय- सुयश ठाकूर, (डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज धुळे), चतुर्थ- लोकेश यशीराव (झेड.बी. पाटील महाविद्यालय धुळे). उत्तेजनार्थ धर्मेश हिरे, विद्यावधीर्नी महाविद्यालय धुळे, हर्षा चव्हाण, झेड.बी.पाटील महाविद्यालय धुळे यांना देण्यात आले. विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली़