धुळे : जिल्ह्यात हळूहळू थंडी जोर वाढू लागला असतांना तीन दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे वातावरणात फरक होऊ लागला आहे. कधी थंडी तर कधी कोवळे ऊनही जाणवते. शनिवारी सकाळी शहरातील किमान तापमान १० अशांवर पोहचले होते. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी धुके झालेले दिसुन आले.यंदा थंडी पडण्यास थोडा उशीर झाला असला तरी थंडीचा जोर काही दिवसांपासून कायम आहे. मागील काही दिवसांपासून तर जिल्ह्याच्या किमान तापमानात सतत उतार येत चालला होता. त्यामुळे हळूहळू थंडी वाढण्यास सुरुवात झाली. मात्र, पुन्हा किमान तापमान वाढत आहे.शहरातील किमान तापमान बुधवार, गुरूवार, शुक्रवारी अशा तिनही दिवसात तापमानाचा पारा १५ ते १६ अशांपर्यत होतो. तर शनिवारी सकाळी तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपर्यत पोहचला होतो. एका दिवसांत जवळपास पाच अंशाने किमान तापमान वाढले. त्यामुळे थंडी कमी झाली. त्यातच शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सकाळीपासून धुळे शहराचे वातावरण गारठले होते. दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने सध्या पहाटे फिरणारे नागरिक ऊबदार कपड्यांचा वापर करत आहेत. तर गरम कपड्याना देखील मागणी वाढली आहे.शहरात पांझरा नदीची चौपाटी परिसर, शंभर फुटीरोड, चाळीसगाव व मालेगावरोडवर शनिवारी सकाळी व सांयकाळी धुके निर्माण झाले होते.
धुळ्याचा पारा पोहोचला १० अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:48 IST