लॉकडाऊनकडे धुळेकरांचा कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:07 IST2020-03-30T22:07:25+5:302020-03-30T22:07:47+5:30
दुर्लक्ष :अत्यावश्यक सेवा सांगत नागरिकांची मोठ्या पुलावर केली गर्दी; कठोर भुमिकेची गरज

dhule
धुळे : कोरोना विषाणूच्या फैलाव अधिक प्रमाणात जास्त होऊ नये, यासाठी संचार बंदी लागु करण्यात आली आहे़ या पार्श्वभुमीवर पांझरा नदीवरील पाचही पुल बंद केले होते़ एकाच पुलावरून नागरिकांची वर्दळ अधिक होत असल्याने सोमवारी पुन्हा कालिका माता मंदिराजवळील फरशी पुल वाहतूकीसाठी सुरू केला आहे़
नागरिकांना वेळोवेळी घरात राहण्याचे
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्याासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी उपाय-योजना केल्या जात आहे़ नागरिकांना घरात राहण्यासाठी आवाहन केले जात आहे़ तर शहरातील मुख्य चौक, गल्ली, मशिद, मंदिर, चर्च, दर्गा, गुरूव्दार बंद ठेवण्यात आले आहे़ तर पांझरा नदीवरील देवपूराकडे जाणारे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे़ त्याासाठी संतोषी माता चौक, बारा पत्थर, पारोळारोड, फाशीपुल अशा विविध ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनाद केला आहे़ गेल्या आठवड्यातील सोमवारी संचार बंदीचे आदेश लागु केले़ त्यानंतर घराबाहेर पळणाऱ्या पोलिसांचे दंडूके बसल्यानंतर अनेकांनी भीतीने घराबाहेर पळणे टाळणे होते़ आठवडाभरानंतर पहिल्या सोमवारी सकाळी जीवनावश्यक वस्तुच्या खरेदीचे कारण बहुसंख्य नागरिकांनी लॉकडाऊनचे उल्लघन करीत घराबाहेर निघाले होते़ त्यामुळे पांझरा नदीवरील पाच पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने सकाळी ११ वाजता लहान पुलावर नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती़
फरशी पुलाचा वापर अत्यावश्यक सेवेसाठी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने पांझरा नदीवरील कालीका माता मंदिर ते जयंहिद स्विमींगकडे जाणारा पुल हा आपत्कालीन व अत्यावश्यक सेवेसाठी नियोजित केला आहे़ तसेच दातासरकार ते सावरकर पुतळा या दरम्यान असलेला नदीवरील पुल हा देवपूराकडून धुळे शहरात येणाºया एकमार्गी सुरू करण्यात आला आहे़ तरी अत्यावश्यक सेवा पुरविणारे शासकीय अधिकारी कर्मचारी, अत्यावश्यक साधन सामुग्री वाहतुक करणारे वाहनधारक यांना आवश्यक पुरावे पडताळून सदर पुलावरून वापरासाठी परवानगी देण्यात येणार आहे़
प्रशासनाच्या आदेशाचे उल्लघन करणाºयावर कठोर कारवाई केली जाईल असे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आऱ एम़ उपासे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे म्हटले आहे़