धुळे जिल्हा परिषद देणार अभियंत्याना पुरस्कार

By अतुल जोशी | Updated: September 18, 2023 15:42 IST2023-09-18T15:40:51+5:302023-09-18T15:42:03+5:30

पुरस्काराचे होणार सीईओंच्याहस्ते वितरण

dhule zilla parishad will give awards to engineers | धुळे जिल्हा परिषद देणार अभियंत्याना पुरस्कार

धुळे जिल्हा परिषद देणार अभियंत्याना पुरस्कार

अतुल जोशी, धुळे :धुळे जिल्हा परिषदेने यावर्षापासून अभियंत्यांना पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. पहिल्या वर्षाच्या पुरस्कारांसाठी चार अभियंत्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना लवकरच हे पुरस्कार देण्यात येतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी सांगितले.
धुळे जिल्हा परिषदेने यावर्षापासून आदर्श अभियंता पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे.

यावर्षांसाठी  ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सहायक अभियंता  अमित शिंदे (शिरपूर), धुळे पंचायत समितीतील  बांधकाम विभागातील  शाखा अभियंता  पी. एन. पवार,  पंचायत समिती लघु सिंचन विभागातील  शाखा अभियंता  के. डी. देवरे (धुळे), जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अनिता कोतवाल यांना या वर्षाचा आदर्श अभियंता पुरस्कार जाहीर करण्यात आला. लवकरच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.      

Web Title: dhule zilla parishad will give awards to engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे