धुळे जिल्हा परिषदेच्या १० कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:14 IST2020-03-04T12:14:22+5:302020-03-04T12:14:41+5:30
सीईओंनी आदेश दिले, कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नाला आले यश

धुळे जिल्हा परिषदेच्या १० कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती
आॅनलाइन लोकमत
धुळे :येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या १० कर्मचाऱ्यांना तब्बल दोन वर्षांनंतर पदोन्नती मिळाली आहे. यात सातजण कनिष्ठ सहाय्यकचे वरिष्ठ सहाय्यक, दोघांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी व एकास सहायक प्रशासन अधिकारीपदी पदोन्नती मिळाली. पदोन्नतीचे आदेश सोमवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांनी पारित केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग ४च्या कर्मचाºयांना गेल्या दोन वर्षांपासून पदोन्नती मिळालेली नव्हती. त्यामुळे महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने दोनवेळा कामबंद आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र अधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनामुळे संघटनेने कामबंद आंदोलन मागे घेतले होते.
दरम्यान सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी कर्मचाºयांचे पदोन्नतीचे आदेश पारीत केले आहेत.
सात कनिष्ठ सहाय्यकांना वरिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नती मिळाली. यात सुरेखा दिनकर गरूड (धुळे), भास्कर लोटन सोनवणे (साक्री), विकास ढोमण चव्हाण (धुळे),प्रवीण दशरथ चौधरी (धुळे),श्रीकांत दत्तात्रय पिटला (धुळे),पोपट बाबुराव सूर्यवंशी (धुळे),विजय गोरख पाटील (धुळे) यांचा समावेश आहे.
तर रंजना साळुंखे यांना सहायक प्रशासन अधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे.
याशिवाय कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून विजय वाघ (धुळे), सुरेश मांडे (शिंदखेडा) यांना पदोन्नती मिळाली. यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच गटनेते वनराज पाटील, किशोर पगारे, देवेंद्र पाटील, रंजना साळुंखे, एकनाथ चव्हाण आदींनी प्रयत्न केले.
दरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी यांचे आभार मानले आहे.