धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:43 IST2019-12-18T11:43:04+5:302019-12-18T11:43:24+5:30

जिल्ह्यात ५६ गट व ११२ गण,उमेदवारी कोणाला मिळते याकडे लक्ष लागून

Dhule Zilla Parishad begins filing nomination papers for today | धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या चारही पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. जिल्हा परिषदेचे ५६ गण व पंचायत समितींच्या ११२ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान व ८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
वर्षापूर्वीच मुदत संपली
डिसेंबर २०१८ मध्ये मुदत संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहचल्याने, तब्बल वर्षभर निवडणुकीस विलंब झाला होता.
निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०१९ रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाºया चारही तालुक्याच्या पंचायत समिती निवडणुकीसाठी १८ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. २३ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येतील. त्यानंतर २४ रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी होईल. अपील नसल्यास अर्ज माघार घेण्याची मुदत ३० डिसेंबर २०१९ आहे. तर अपील असल्यास अर्ज १ जानेवारी २०२० रोजी मागे घेता येतील. ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होईल. तर ८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
तालुक्याच्या ठिकाणी अर्ज दाखल होणार
दरम्यान निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केलेली आहे. प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे बुधवारपासून तहसील कार्यालयांना यात्रेचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे.

Web Title: Dhule Zilla Parishad begins filing nomination papers for today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे