शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

धुळे महापालिकेत ‘कमळ’ फुलविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:14 PM

अनिल गोटे : भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक; स्वबळावरच निवडणूक लढण्याचा केला निर्धार

ठळक मुद्देनीलम व्होरा म्हणाल्या, की पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांची किंमत राहिलेली नाही. बाहेरील पक्षातून आलेल्या ‘कचराकुंड्या’ आज पक्षाला चांगले दिवस आलेत म्हणून सोबत आहे. परंतु, याच ‘कचराकुंड्या’ पक्ष संकटात असताना पक्ष सोडून जातील. देशात आज भाजपा पक्ष मोठा आहेत.परंतु, स्थानिक परिस्थितीचा विचार केला तर पक्षात गट-तट पडलेले आहे. घरातील भांडण चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले. बैठकीपूर्वी सोशलसाईट्सवर पक्षातील काहींनी आफवा पसरवत या बैठकीला जाऊ नका, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे आज झालेल्या बैठकीला भाजपाचे महानगराध्यक्ष अनूप अग्रवाल यांच्यासह काही स्थानिक पदाधिकाºयांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसू

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मनपात सत्ता परिवर्तन घडवायचे आहे. जे सोबत येतील. त्यांना सोबत घेऊन व जे नाही येणार त्यांना खाली पाडून येणाºया महापालिका निवडणुकीत मनपावर कमळ फुलवून भाजपाची सत्ता आणायची आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाके कामाला लागावे. मनपात सत्ता परिवर्तन घडविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी येथे केले. दरम्यान, आगामी मनपा निवडणूक भाजपा स्वबळावरच लढणार असून या निवडणुकीत आम्ही कोणाशीही युती करणार नाही, असे त्यांनी येथे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आमदार गोटे यांची विधानसभा मतदार संघाच्या पालकपदी निवड केली. त्यापार्श्वभूमीवर आगामी मनपा व इतर निवडणुकांबाबत पक्षीय संघटन मजबूत करण्यासाठी शुक्रवारी शहरातील कल्याण भवनात भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, संजय बोरसे, रत्ना बडगुजर, माजी आमदार धरमचंद चोरडिया, दिलीप साळुंखे, योगेश मुकुंदे, भीमसिंग राजपूत, नगरसेविका वैभवी  दुसाणे, प्रतिभा चौधरी, नीलम व्होरा, हिंमतराव पवार, माजी जि.प. सदस्य संभाजी पगारे,  तेजस गोटे व कार्यकर्ते उपस्थित होते. ३० डिसेंबरला मनपा निवडणुकीचा विजयी बिगुल वाजवू...आमदार गोटे म्हणाले, की सफारी गार्डनमुळे शहराच्या लौकीकात भर पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी पाठपुरावा होता. अखेर या सफाई गार्डनच्या जागेला मंजुरी मिळाली आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ३० डिसेंबरला सायंकाळी सात वाजता भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत तेथे उपस्थित रहावे. येताना आपआपल्या जेवणाचे डबे सोबत आणावे. हा आनंदोत्सव साजरा करताना, त्याच दिवशी येणाºया मनपा निवडणुकीचा विजयी बिगुल वाजवू, असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांना दिली निवडणूक जिंकवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर विधानसभा मतदार संघाच्या पालकपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर मुख्यमंत्र्यांना महापालिका निवडणूक जिंंकून देण्याची ग्वाही त्यांना दिली आहे. त्यादृष्टीने पक्षीय संघटन येत्या काळात मजबूत करायचे आहे. विकासाची कास असणाºया उमेदवाराला या निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल. ज्यांनी पक्षासाठी ‘हाडाचे काडं’ केले. त्यांचाही विचार केला जाईल. त्यांना सोबत घेऊनच ही लढविण्यात येईल, असे आमदार गोटे म्हणाले. स्वबळावरच भाजपा लढणार केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे. विकासाचे वारे सर्वत्र वाहत असल्यामुळे ‘अच्छे दिन’ सुरू आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीत भाजपाला निश्चितच यश मिळेल, असे चित्र असताना भाजपा ही निवडणूक कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावरच लढणार असल्याचा निर्धार, आमदार गोटे यांनी बैठकीत केला. मनपा निवडणूक ही पैशावर न लढता, मतदारांचा विश्वास संपादीत करून जिंकायची असल्याचे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले. जी मुलगी आईचे ऐकत नाही, ती सासूचे कसे ऐकणार?भाजपाच्या कार्यकर्त्या नीलम व्होरा यांनी  पक्षात निष्ठावान कार्यकर्ते असतानाही बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना पदे किंवा उमेदवारी दिली जाते, असे सांगत खंत व्यक्त केली. त्यावर बोलताना आमदार गोटे म्हणाले, की कार्यकर्ते ही खरी पक्षाची संपत्ती आहे. त्यामुळे पक्षात बाहेरून आलेल्या कार्यकर्ते पदाधिकाºयांची परिस्थिती ‘जी मुलगी आईचे ऐकत नाही, ती सासूचे कसे ऐकणार’, अशी असल्याचे सांगत पक्षातील विरोधकांचा समाचार घेतला. पुढे त्यांनी येणाºया निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले. मंडळनिहाय, प्रभागनिहाय बैठकांवर भर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबरनंतर शहरात विभाग, मंडळनिहाय बैठका या  शनिवार व रविवारी घेतल्या जातील. नागरिकांच्या अडचणी आमदार गोटे हे स्वत: गृहभेटी देऊन जाणून घेणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी  पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.