धुळे गारठले, पारा ६ अंशावर ठिकठिकाणी पेटल्या शेकोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 21:36 IST2021-01-30T21:36:37+5:302021-01-30T21:36:57+5:30

सकाळच्या वेळेचे जनजीवन विस्कळीत : गरम कपड्यांना वाढली मागणी

Dhule was burnt, fires were lit at 6 degrees mercury | धुळे गारठले, पारा ६ अंशावर ठिकठिकाणी पेटल्या शेकोटी

धुळे गारठले, पारा ६ अंशावर ठिकठिकाणी पेटल्या शेकोटी

धुळे : धुळ्याचे पारा सहा अंशावर जावून पोहचला आहे़ त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी शेकोटी पेटविल्या जात असल्याचे दिसून येत आहे़ तसेच उबदार कपड्यांनाही मागणी वाढू लागली असून दुकाने पुन्हा थाटली आहेत़ परिणामी सकाळी उशिरापर्यंत आणि रात्री लवकर धुळ्यातील रस्ते निर्मनुष्य दिसू लागले आहेत़
तापमानात घट
गेल्या पंधरा दिवसांपासून धुळ्यासह परिसरात थंडीचे प्रमाण कमी अधिक होत आहे़ त्याचा परिणाम हा जनजीवनावर होऊ लागला आहे़ सुरुवातीला तापमान हे १२ होते़ नंतर १० झाले़ आठ दिवसांपुर्वी हेच तापमान ७ अंशावर आले होते़ थंडी कमी होत असल्यामुळे बंद पडलेले गरम कपड्यांचे स्टॉल आता पुन्हा उघडले आहेत़ गरम व उबदार कपड्यांना धुळेकरांकडून मागणी वाढताना दिसून येत असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे़
शेकोटी पेटली
तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरीकांकडून शेकोटी पेटविल्या जात आहेत़ त्यात सकाळच्या वेळेस रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि भाजीपाला विक्रेत्यांसह सकाळच्या वेळेस कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरीकांसह स्वच्छता कर्मचारी यांच्याकडून शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होताना दिसून येत आहे़
व्यवसायावर परिणाम
वाढणाºया थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरीकांकडून प्रयत्न होत असतानाच त्याचा काही अंशी बाजारपेठेवर देखील परिणाम झाल्याचे दिसून येत आहे़ सायंकाळी बाजारपेठेतील गर्दी लवकर कमी होत आहे़ तर दिवसा देखील उशिराने दैनंदिन व्यवहार सुरु होत आहेत़

Web Title: Dhule was burnt, fires were lit at 6 degrees mercury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे