धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपीक सतीश जाधव निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 22:31 IST2020-07-31T22:31:29+5:302020-07-31T22:31:49+5:30
पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी कारवाई

धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपीक सतीश जाधव निलंबित
धुळे : पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना शाखेतील लिपीक सतीश जाधव याला २० हजाराची चिरीमिरी घेताना रंगेहात सापडल्यामुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी त्याला तडकाफडकी निलंबित केले आहे़ या कारवाईमुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात याच विषयावर चर्चा सुरु आहे़
पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना शाखा ही सर्वात महत्वाची शाखा मानली जाते़ या शाखेत वर्णी लागावी अशी अनेक लिपीकांची इच्छा असते़ या विभागात एका प्रकरणात दोन पोलिसांनी आंतरजिल्हा बदलीसाठी आस्थापना शाखेतील लिपीक सतीश जाधव याच्याकडे अर्ज केला होता़ या बदलीची टिपणी बनविणे व वरिष्ठांकडे ठेवण्यासाठी २० हजाराची मागणी त्याने केली होती़ याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली़ याकामी एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांची मदत घेऊन सापळा लावून जाधवला रंगेहात पकडण्यात आले़