धुळे ग्रामीण तहसिल कार्यालय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:38 IST2020-07-13T21:37:34+5:302020-07-13T21:38:24+5:30
नागरिकांना नो एन्ट्री : कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने निर्णय

dhule
धुळे : येथील धुळे ग्रामीण तहसिल कार्यालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने कार्यालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़
धुळे ग्रामीणचे नायब तहसिलदार नरेंद्र उपासनी यांनी सांगितले की, तहसिल कार्यालयात तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते़ त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीन दिवस कार्यालय बंद करण्यात आले आहे़ प्रशासकीय कामाकाज मात्र नियमीतपणे सुरू असणार आहे़ केवळ नागरिकांना कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही़ आवश्यक कामांसाठी कर्मचारी कार्यालयात येतील़ अनावश्यक उपस्थितीवर तात्पुरती मर्यादा आणली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले़
धुळे ग्रामीण तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना कक्षात कार्यरत एका पुरूष कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला़ सदर कर्मचारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे तीन ते चार दिवसांपासून घरीच होता़ त्यामुळे संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब अजुन आरोग्य यंत्रणेने घेतले नाहीत़
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संजय गांधी निराधार कक्ष सॅनिटाईझ करुन सील केला आहे़
तहसिल कार्यालयाचा संपूर्ण परिसर देखील फवारणी करुन निर्जंतूक करण्यात आला आहे़