शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑ केसरी स्पर्धेतील धुळ्याचा शिलेदार....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:10 IST

हर्षल गवते याची कास्यं पदकाची कमाई

धुळे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जवळपास २० वर्षांच्या कालावधीनंतर धुळे जिल्ह्याला पदक मिळवून देण्याची कामगिरी हर्षल घनश्याम गवते या पहेलवानाने केली आहे.हर्षल घनश्याम गवते याला सागर या नावानेही ओळखले जाते. लहानपणापासून कुस्तीची आवड असलेल्या हर्षल याने यंदा झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ८६ किलो वजन गटात कांस्य पदकाची कमाई केली. धुळे जिल्ह्याला हा मान सुमारे २० वर्षांनंतर मिळाला. रामदास व्यायाम शाळेचा मल्ल असलेला हर्षल याच्यात असलेले कुस्तीचे कौशल्य हे तसे अनुवंशिकच म्हणावे लागेल. त्याचे वडील घनश्याम गवते हे आपल्या काळात एक प्रसिद्ध मल्ल होते. त्यानंतर हर्षलचा मोठा भाऊ धीरज याने देखील अनेक दंगली गाजवल्या आहेत. तसेच त्याने शालेय आणि इतर स्पर्धांमध्ये देखील चांगली कामगिरी केली. त्याला खेळाडू कोट्यातून पोलीस दलात नोकरी देखील मिळाली.वडील आणि मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत धाकट्या हर्षल याने रामदास व्यायाम शाळेत कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली. वडील घनश्याम गवते यांनी त्याला कुस्तीचे धडे दिले. त्यानंतर त्याने पाचवीत असताना विविध आंतरशालेय कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सुरूवात केली. त्याने सातत्याने त्यात यश मिळवले. २०११ मध्ये तो राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत ४६ किलो गटात देखील सहभागी झाला होता. त्यात त्याने कांस्य पदक मिळवून आपल्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात क्रीडा प्रबोधिनीला पाठवले. मात्र तेथे काही महिने सराव करून तो लगेचच भरत निकाले यांच्याकडे एक वर्षे सराव आणि प्रशिक्षण घेतले. त्याचाच फायदा त्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झाला.हर्षल याने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत दोन कांस्य, दोन रौप्य आणि एका सुवर्ण पदकाची कमाई केली.२०१४ मध्ये क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पायका राष्ट्रीय स्पर्धेत देखील त्याने ४६ किलो गटात कांस्य पदक पटाकवले होते. याच वर्षी त्याने यवतमाळमध्ये झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाआतील गटात कांस्य पदकाची कमाई केली होती.गेल्या दहा वर्षातील त्याची ही सातत्यपूर्ण कामगिरी कुस्तीगिरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

टॅग्स :Dhuleधुळे