धुळयात आता केवळ भाजपचेच वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 04:35 PM2018-07-01T16:35:15+5:302018-07-01T16:36:19+5:30

आमदार अनिल गोटे, मनपा निवडणूकीत यश आपलेच असल्याचा दावा

Dhule is now the only BJP environment | धुळयात आता केवळ भाजपचेच वातावरण

धुळयात आता केवळ भाजपचेच वातावरण

googlenewsNext
ठळक मुद्दे- भाजपच्या प्रमुख पदाधिकाºयांची बैठकीकडे पाठ- आपल्या कार्यकर्त्यांच्या वाढत्या संख्येची विरोधकांना चिंता- धुळयात आता भाजपाचेच वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  शहराचा विकास करायचा असेल तर महापालिकेची सत्ता मिळवावी लागेल, त्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल़ धुळयात आता भाजपचेच वातावरण असून मनपा निवडणूकीत यश आपलेच आहे, अशी भुमिका आमदार अनिल गोटे यांनी मांडली़ 
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक कोतवाल भवन येथे आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीकडे भाजपच्या प्रमुख पदाधिकाºयांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले़ व्यासपीठावर भिमसिंग राजपूत, विजय अग्रवाल, तेजस गोटे, प्रतिभा चौधरी, वैभवी दुसाणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़ या कार्यक्रमात बोलतांना आमदार अनिल गोटे म्हणाले की, आपल्या कार्यकर्त्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या विरोधकांची चिंता वाढवत आहे़ परंतु चिंता न करता आम्ही केलेलं काम हाच आमचा पक्ष, अनिल गोटे हाच आमचा पक्ष अशी भुमिका जनतेसमोर मांडावी, असे आवाहन आमदार गोटे यांनी केले़


 

Web Title: Dhule is now the only BJP environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.