शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

धुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 3:47 PM

१४ कोटी ६३ लाखांचा होता प्रकल्प, सुधारीत आराखड्यानंतर निघणार निविदा

ठळक मुद्दे-जानेवारी महिन्यात काढली होती प्रकल्पाची निविदा-राज्यातील अन्य महापालिका, नगरपालिकांकडून घेणार माहिती-कचरा संकलन व प्रक्रिया एकाच संस्थेकडून करण्याचा विचार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेने शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी काढलेली १४ कोटी ६३ लाख रूपयांची निविदा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली़ सुधारीत डिझाईन तयार करून नव्याने निविदा काढली जाईल, असेही ते म्हणाले़महापालिकेने जानेवारी महिन्यात एकूण १४ कोटी ६३ लाख रूपयांची निविदा काढली आहे़ त्यात बायोमायनिंगसाठी ५ कोटी १२ लाख ६६ हजार ६७०, लॅन्डफिल करण्यासाठी ५ कोटी ४१ लाख ७३ हजार ८४१ व प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ४ कोटी ९ लाख ५० हजार इतका खर्च येणार आहे़ मात्र शहरात कचरा संकलनाबाबतही तक्रारी असल्याने कचरा संकलन व त्यावरील प्रक्रिया एकाच संस्थेकडून व्हावी, त्यासाठी प्रति टन कचरा संकलनावर होणारा खर्च लक्षात घेऊन व अन्य ज्या महापालिका, नगरपालिकांनी कचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्या आहेत, त्यांच्याकडून माहिती मागवून घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने निविदा काढली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली़ त्यामुळे १४ कोटी ६३ लाख रूपयांची निविदा मनपाकडून लवकरच रद्द केली जाणार आहे़