धुळे मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर ‘सपा’चे धरणे
By Admin | Updated: May 11, 2017 16:44 IST2017-05-11T16:44:58+5:302017-05-11T16:44:58+5:30
विस्कळीत पाणीपुरवठय़ाप्रश्नी गुरूवारी समाजवादी पार्टीतर्फे मनपात धरणे आंदोलन करण्यात आल़े

धुळे मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर ‘सपा’चे धरणे
धुळे,दि.11- महापालिकेच्या वसुली विभागाकडून नवीन बांधकामांना होणारी सहा वर्षापासूनची करआकारणी व विस्कळीत पाणीपुरवठय़ाप्रश्नी गुरूवारी समाजवादी पार्टीतर्फे मनपात धरणे आंदोलन करण्यात आल़े आयुक्त संगीता धायगुडे यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आल़े यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़
शहर पाणीपुरवठय़ासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असतांना मनपा प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आह़े व्हॉल्वमनची संख्या कमी आह़े पाणी वितरणात त्रुटी असून तापी जलवाहिनीला सातत्याने लागणा:या गळत्यांच्या दुरूस्तीचे काम ऐन उन्हाळयात केले जात़े वाखारकर नगरात जलकुंभाची उभारणी झाली असतांना तो सुरू करण्यात आलेला नाही, जामचा मळा भागात जलकुंभाचे काम संथगतीने सुरू आह़े एकूणच या सर्व गोंधळामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आह़े
आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका:यांना जाब विचारत तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिल़े यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे हे उपस्थित होते व बंदोबस्त तैनात होता़ आंदोलनात अकील अन्सारी, गोरख शर्मा, कल्पना गंगवाल, जमील मन्सुरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होत़े