धुळे मनपा आयुक्त संगीता धायगुडेंची मालेगावला बदली!

By Admin | Updated: June 1, 2017 16:19 IST2017-06-01T16:19:03+5:302017-06-01T16:19:03+5:30

मुख्यमंत्र्यांकडून विशेष नियुक्ती : वखार महामंडळाचे संचालक सुधाकर देशमुख मनपाचे नवीन आयुक्त

Dhule Municipal Commissioner, Sangeeta Dhayududej, changed her Malegaon! | धुळे मनपा आयुक्त संगीता धायगुडेंची मालेगावला बदली!

धुळे मनपा आयुक्त संगीता धायगुडेंची मालेगावला बदली!

ऑनलाईन लोकमत

धुळे , दि. 1 -  महापालिकेच्या कर्तव्यदक्ष आयुक्त संगीता धायगुडे यांची मालेगाव महापालिका आयुक्तपदी बदली झाली आह़े त्याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी निघाल़े पुणे येथील वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा सचिव  सुधाकर देशमुख यांची धुळे मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली आह़े
संगीता धागयुडे यांनी 20 जून 2016 ला आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला होता़ त्यामुळे येत्या 20 जूनला त्यांच्या कार्यकाळाची वर्षपूर्ती होणार होती़ तत्पूर्वीच बुधवारी सायंकाळी मंत्रालयात अचानक हालचाली झाल्या व आयुक्तांच्या बदलीचे आदेश काढण्यात आल़े नवीन आयुक्त सुधाकर देशमुख हे चार ते पाच दिवसांनी  मनपा आयुक्तपदाचा पदभार स्विकारणार आहेत़ 
महापालिकेचे सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांची लातूर मनपा सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आह़े  तर धुळे मनपा सहायक आयुक्तपदी नंदुरबार येथील जिल्हा प्रशासन अधिकारी शांताराम गोसावी यांची नियुक्ती झाली आह़े 

Web Title: Dhule Municipal Commissioner, Sangeeta Dhayududej, changed her Malegaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.