महापालिकेची बससेवा सुरू हाेणार; महासभेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2023 16:54 IST2023-09-13T16:54:18+5:302023-09-13T16:54:29+5:30
१२६ पदांची नाेकरभरती, जन्म-मृत्यू दाखले माेफत

महापालिकेची बससेवा सुरू हाेणार; महासभेत ठराव
राजेंद्र शर्मा
धुळे : महापालिकेत कर्मचाऱ्यांची वाणवा असून अ ते ड या संवर्गातील सरळसेवेतून रिक्त पदे भरणे, बससेवा तसेच पेट्राेल पंप सुरू करणे व जन्म आणि मृत्यूचे दाखले निशुल्क उपलब्ध करून देणे आदी लाेकाेपयाेगी आणी उत्पन्नाचे स्त्राेत वाढविणाऱ्या विषयांना महासभेत एकमुखाने मंजूरी देण्यात आली.
याबाबत सदस्यांनी सूचित केलेल्या विविध सूचना लक्षात घेता प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश महापाैरांनी दिले.अटलबिहारी बाजपेयी सभागृहात पार पडलेल्या महासभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर प्रतिभा चाैधरी हाेत्या. आयुक्त अमिता दगडे पाटील, नगरसचिव मनाेज वाघ मंचावर हाेते.