धुळे वनविभागाने लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:52 IST2018-04-27T17:52:54+5:302018-04-27T17:52:54+5:30

आर्वी-मोराणे रस्त्यावर कारवाई, ४ लाख १० हजाराचा ऐवज जप्त

Dhule forest department seized a truck carrying illegal truck | धुळे वनविभागाने लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

धुळे वनविभागाने लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

ठळक मुद्देगुप्त माहितीवरून केली कारवाईट्रकसह लाकूड घेतले ताब्यात कारवाईमुळे खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वनविभागाच्या पथकाने लाकडाची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पकडला. ही कारवाई गुरूवारी रात्री आर्वी-मोघण रस्त्यावर करण्यात आली. लाकडासह ट्रक जप्त केला असून, त्याची एकत्रित किंमत सुमारे ४ लाख १० हजार रूपये आहे.
आर्वीकडून मालेगावकडे ट्रकमधून अवैधरित्या लाकडाची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने आर्वी-मोघण रस्त्यावर गस्त घालीत असतांना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक (क्र.एमएच ३९-सी ६०५) दिसला. ट्रकची तपासणी केली असता, त्यात अनघड, नीम जातीचे लाकूड आढळून आले. चालकाजवळ लाकूड वाहतुकीचे कागदपत्रे नव्हती. या कारवाईत लाकूड व वाहन असा एकूण ४ लाख १० हजाराचा माल वनविभागाच्या पथकाने जप्त केला आहे.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, वनपाल बी.एस. भामरे, वनरक्षक सी.एस.कचवे, बी.बी.पाटील, व्ही.डी.कांबळे, के.वाय. आखाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title: Dhule forest department seized a truck carrying illegal truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे