धुळे जिल्ह्याला खरीपासाठी ४९ हजार क्विंटल बियाणे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:26 IST2018-04-30T16:26:49+5:302018-04-30T16:26:49+5:30

गेल्यावर्षापेक्षा १३ हजार क्विंटल जास्त बियाण्याची मागणी

Dhule district will require 49 thousand quintals of seed for procurement | धुळे जिल्ह्याला खरीपासाठी ४९ हजार क्विंटल बियाणे लागणार

धुळे जिल्ह्याला खरीपासाठी ४९ हजार क्विंटल बियाणे लागणार

ठळक मुद्देजिल्ह्याचे खरीप क्षेत्र ४ लाख २३ हजार हेक्टरकृषी विभागातर्फे बियाण्याचे नियोजनगेल्यावर्षापेक्षा जास्त मागणी

आॅनलाइन लोकमत
धुळे : खरीपाच्या हंगामासाठी जिल्ह्यात ४८ हजार ९७० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यात महाबीजकडून १८ हजार ४२७ तर खाजगी कंपनीकडून ३० हजार ५४३ क्विंटल बियाणे मागितलेले आहे.  गेल्यावर्षापेक्षा यावर्षी १३ हजार २२१ क्विंटल बियाण्यांची जादा मागणी करण्यात आलेली असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात ४ लाख २३हजार  हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. खरीपाच्या हंगामात कपाशीबरोबरच ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते.
खरीपाची लागवड लक्षात घेता कृषी विभागातर्फे बियाण्यांचे नियोजन केले आहे.
गेल्या वर्षातर्फे १३ हजार २२१ क्विंटल जास्त
२०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामासाठी महाबीज व खाजगी उत्पादकांकडून जिल्ह्याला ३५ हजार ७४९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते. यावर्षी खरीपाचे नियोजन लक्षात घेता, कृषी विभागामार्फत ४८ हजार ९७० क्विंटल बियाण्यांची मागणी केलेली आहे. गेल्यावर्षापेक्षा ही मागणी १३ हजार २२१ क्विंटलने जास्त आहे.
मागणी करण्यात आलेले बियाणे असे
संकरीत ज्वारी २ हजार १० क्विंटल, सुधारित ज्वारी १२५, संकरित बाजरी २,२८०, सुधारित बाजरी ८४, भात २,४००, मका १४,३२०, तूर १,८०२, मूग ३,२१३, उडीद १,०५३, भुईमुग ४,७००, तीळ १०८, सोयाबीन १६,८७५ क्विंटल. यात धुळे तालुक्यासाठी १०, ६७१, साक्री तालुक्यासाठी १७,५८२, शिंदखेडा तालुक्यासाठी १०,४९९, तर शिरपूर तालुक्यासाठी १०,२१८ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. यापैकी महाबीजकडून १८ हजार ४२७ तर खाजगी कंपनीकडून ३० हजार ५४३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे.


 

Web Title: Dhule district will require 49 thousand quintals of seed for procurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.