धुळे जिल्ह्याला खरीपासाठी १ लाख ११ हजार मेट्रीक टन खत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 12:03 IST2018-04-27T12:03:16+5:302018-04-27T12:03:16+5:30
कृषी विभागाचे नियोजन,गेल्या वर्षाचा साठा शिल्लक

धुळे जिल्ह्याला खरीपासाठी १ लाख ११ हजार मेट्रीक टन खत मिळणार
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यात खरीपाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. खरीप हंगामासाठी यावर्षी १ लाख २ हजार ७१० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. गेल्यावर्षाचा ८ हजार ८४२ मेट्रीक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे १८-१९ या हंगामासाठी तब्बल १ लाख ११ हजार ५५२ मेट्रीक टन खत उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात खरीपाची लागवड जवळपास ४ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर केली जाते. सर्वाधिक लागवड ही कपाशीची करण्यात येते. खरीप हंगामासाठी १ लाख २ हजार ७१० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. यात युरिया ४५ हजार १४० मेट्रीक टन, डी.ए.पी. ६ हजार ७१० मे.टन, एस.एस.पी.१४ हजार ९४०, एम.ओ.पी.९ हजार २०, एन.पी.के.२६ हजार ९०० मेट्रीक टन या खतांचा समावेश आहे. जिल्ह्यात ११०४ रासायनिक खते विक्रेते आहेत. त्यांच्या मार्फतच ही खत विक्री होणार आहे.
गेल्या वर्षाचा साठा शिल्लक
२०१७-१८ मध्ये जिल्ह्यासाठी खरीप हंगामात ७७ हजार ३८० मेट्रीक टन खताचा प्रत्यक्ष वापर करण्यात आल. तर रब्बी हंगामात २८ हजार ६८५ मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला. दोन्ही हंगाम मिळून १ लाख ६ हजार ६५ मेट्रीक टन खताचा वापर करण्यात आला. त्यातून ८ हजार ८४२ मेट्रीक टन खत शिल्लक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.