व्यावसायिकांना क्यूआर कोड देण्यात धुळे जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:05+5:302021-02-05T08:46:05+5:30
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टपाल कार्यालयाकडून ग्राहकांसह आता लहान व मोठ्या व्यावसायिकांना डिजिटल आर्थिक व्यवहार करता यावा, यासाठी जिल्हा ...

व्यावसायिकांना क्यूआर कोड देण्यात धुळे जिल्हा अव्वल
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टपाल कार्यालयाकडून ग्राहकांसह आता लहान व मोठ्या व्यावसायिकांना डिजिटल आर्थिक व्यवहार करता यावा, यासाठी जिल्हा टपाल कार्यालयाची संलग्नित असलेल्या शहरातील १४ पोस्ट कार्यालयामार्फेत आग्रारोड, पारोळारोड, पाचकंदील, फुलवाला चाैक, देवपूर तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिकांना इंडिया पोस्ट योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सरकारी अधिकृत क्यूआरकोड सुविधेची माहिती देण्यात आली होती. या सर्वक्षण अभियातून सुमारे चारशे व्यावसायिकांना एकाच दिवसात विनामूल्य डिजिटल प्लॅस्टिक क्यूआरकोड देण्यात आला आहे.
तालुका व गावनिहाय मोहीम राबविण्याची संकल्पना
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसह व्यावसायिकांना डिजिटल आर्थिक व्यवहार करता यावा, यासाठी फेब्रुवारी महिन्यात धुळे टपालकडून शिंदखेडा, साक्री, शिरपूर तसेच धुळे तालुक्यात जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना घरपाेच खाते उघडण्यात येणार आहे. त्यानंतर गावनिहाय मोहीम राबविण्यात येणार आहे.
शेतकरी, विद्यार्थी, महिलांसह सर्वसामान्यांना लाभ
शासनाच्या विविध योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करीत असतो. शेतकऱ्यांसाठी असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत देशातील ८.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्हा टपाल विभागांतर्गत धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा आणि नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा व नवापूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थी घरबसल्या दिला जातो.
एकाच दिवसात २०० ग्राहक
पिंपळनेर शहरात एकाच दिवसात सुमारे दाेनशे ग्राहकांनी खाते उघडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ग्राहकांनी पोस्टात बँकेत खाते उघडली आहे.