कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका, लॉन्स, हॉटेल्स ३१ मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 16:28 IST2020-03-20T16:28:19+5:302020-03-20T16:28:41+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक येण्यास मनाई

Dhule district studies, lawns, hotels closed till March 3 to prevent Corona outbreak | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका, लॉन्स, हॉटेल्स ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका, लॉन्स, हॉटेल्स ३१ मार्चपर्यंत बंद

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका, लग्न व अन्य समारंभाची सभागृहे, शैक्षणिक संस्थेचे मैदान, रहिवास वस्तीमधील मैदाने, लॉन्स, हॉटेलमधील अथवा अन्य वास्तूमधील मॅरेज हॉल, कम्युनिटी सेंटर, पानपट्टी, कॉफी, ज्यूस हाऊस, सर्व हॉटेल्स (होम डिलिव्हरी वगळून), सर्व परमीटरूम, बिअरबार, उद्याने, संग्रहालये, आॅनलाइन लॉटरी सेंटर, प्रशिक्षण वर्ग ३१ मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
राज्यात कोरोना विषाणूमुळे उदभवणाºया संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी व राज्यात करोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणासाठी आपत्कालिन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. साथरोग अधिनियमातील खंडानुसार राज्यात साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी १३ मार्च २०२० पासून सुरू झाली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका, लग्न व अन्य समारंभाची सभागृहे, शैक्षणिक संस्थेचे मैदान, रहिवास वस्तीमधील मैदाने, लॉन्स, हॉटेल मधील अथवा अन्य वास्तू मधील मॅरेज हॉल, कम्युनिटी सेंटर, पानपट्टी, कॉफी, ज्यूस हाऊस, सर्व हॉटेल्स (होम डिलिव्हरी वगळून), सर्व परमिट रूम, बिअरबार, उद्याने, संग्रहालये, आॅनलाईन लॉटरी सेंटर, प्रशिक्षण वर्ग आदी स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्यात येत आहेत.
तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अनावश्यक सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील. याशिवाय वर नमूद ठिकाणी याआधी कार्यक्रमासाठी आरक्षण, परवानगी दिलेली असल्यास ती रद्द करण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र उपाययोजना नियम, भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.

Web Title: Dhule district studies, lawns, hotels closed till March 3 to prevent Corona outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे