धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १४६७ रुग्णांची केली स्क्रीनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:45 IST2020-03-29T12:45:04+5:302020-03-29T12:45:24+5:30
आतापर्यंत ५९ रूग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १४६७ रुग्णांची केली स्क्रीनिंग
आॅनलाइन लोकमत
धुळे : शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आतापर्यंत एकूण १ हजार ४६७ रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आतापर्यंत १४६७ रुग्णांची स्क्रीनिंग केली आहे. त्यातील १४५८ रुग्ण चांगले केलेत. ५९ रुग्णांना मागील दहा दिवसापासून विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यातील ३१ रुग्णांचे नमुने पुण्याला प्रयोगशाळेत पाठविले व ते सगळे निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती डॉ.सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ.नागसेन रामराजे हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी आपण सर्वजन घरातच राहा. आपल्या जवळच्या लोकांच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी २१ दिवस घरात राहून एक मोठे कर्तव्य आपण करा. आपण सर्व एकजूट राहिलो तर कोरोना चा पराभव आपण करू शकतो असे आवाहन डॉ.सूर्यवंशी यांनी केले.