शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

धुळे जिल्हयात फक्त ३१ सार्वजनिक मंडळांनी घेतले अधिकृत वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 8:52 PM

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिला महावितरणला ‘शॉक’

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात यावर्षी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात लहान-मोठे मिळून एकूण ५१३ मंडळांनी हा उत्सव साजरा केला. हा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले होते. मात्र सार्वजनिक मंडळांनीच महावितरणला ‘शॉक’ दिला आहे. जिल्ह्यात ५१३ पैकी अवघ्या ३१ मंडळांनीच अधिकृत वीज कनेक्शन घेतल्याचे महावितरण कार्यालयातून सांगण्यात आले.गणेशोत्सवात अनेक मंडळांचा विद्युत रोषणाईवर भर दिला जातो. सार्वजनिक मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले होते. त्यासाठी एक खिडकी सुरू करण्यात आली होती. सार्वजनिक मंडळांना सवलतीच्या दरातच वीज देण्यात येणार होती. तसेच अनधिकृत वीज कनेक्शन रोखण्यासाठी भरारी पथकाचीही नियुक्ती करण्यात आली होती. आकोडे टाकून वीज घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देण्यात आला होता. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महावितरणलाच ‘शॉक’ दिला आहे. जिल्ह्यात १७ पोलीस स्टेशन अंतर्गत २८८ लहान व १६४ मोठे सार्वजनिक, ५९ गावात एकगाव एक गणपती अशी एकूण ५१३ मंडळांनी उत्सव साजरा केला. मात्र यापैकी अवघ्या ३१ सार्वजनिक मंडळांनीच अधिकृत वीज पुरवठा घेतल्याची माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली आहे. यातील काही मंडळांनी वीज पुरवठ्यासाठी जनरेटरचा वापर केला असण्याची शक्यता आहे. असे असले तरी अनेक मंडळांनी अनिधिकृत वीज कनेक्शन घेऊनच हा उत्सव जल्लोषात साजरा केल्याचे दिसून येत आहे.भरारी पथक निष्क्रियवीज चोरीला आळा बसावा म्हणून महावितरणतर्फे भरारी पथकाची नियुक्ती केली होती. असे असतांनाही जिल्ह्यातील बहुतांश मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घेतलेले नाही. त्यामुळे भरारी पथकाने नेमकी काय तपासणी केली असा प्रश्न उपस्थित होत आहे.माहिती देण्यास टाळाटाळदरम्यान जिल्ह्यात किती मंडळांनी वीज पुरवठा घेतला याची माहिती महावितरणकडे मागितली असता, एक महिना त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

टॅग्स :Dhuleधुळे