धुळे जिल्ह्यात फक्त १३२ क्विंटल मुगाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 11:18 IST2019-11-29T11:17:54+5:302019-11-29T11:18:12+5:30

तीन केंद्रापैकी फक्त दोंडाईचा, शिरपूर केंद्रावर मुगाची झाली आवक

 In Dhule district only 5 quintals of munga are procured | धुळे जिल्ह्यात फक्त १३२ क्विंटल मुगाची खरेदी

धुळे जिल्ह्यात फक्त १३२ क्विंटल मुगाची खरेदी

आॅनलाइन लोकमत
धुळे :नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमी भावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. मात्र या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. गेल्या एका महिन्यात फक्त दोंडाईचा व शिरपूर हे दोन केंद्र मिळून १३२ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आलेली आहे. तर उडीद व सोयाबीनची आवकच झालेली नसल्याची माहिती जिल्हा मार्केटींग कार्यालयातून देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मालाला हभी भाव मिळावा यासाठी २०१९-२० या हंगामासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात धुळे, शिरपूर व दोंडाईचा या तीन केंद्रावर १६ सप्टेंबर २०१९ पासून आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. शासनाने यावर्षी मुगाला ७ हजार ५०, उडीदला ५७०० तर सोयाबीनला ३७१० रूपये प्रति क्विंटल भाव जाहीर केलेला आहे.
नोंदणी सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला मात्र या खरेदी केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत दोंडाईचा केंद्रावर ८० तर शिरपूर केंद्रावर ५२ अशी एकूण १३२ क्ंिवटलची मुगाची खरेदी करण्यात आलेली आहे. धुळे कुठलीच आवक झालेली आहे.दरम्यान इतर तीनही केंद्रावर उडीद व सोयाबीनची आवकही झालेली नाही. हमी भावाने मुग,उडीद खरेदी करण्यासाठी त्यात आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्के असणे गरजेचे आहे. मात्र यावर्षी संततधार सुरू असल्याने, मुग, उडीदामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या धान्याची शासकीय केंद्रावर फारशी आवक झाली नसल्याचेही सांगण्यात आले. गेल्यावर्षीही जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली होती. त्याला शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्या प्रमाणात यावर्षी काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. ज्या शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे, त्यांना मोबाईलद्वारे एसएमएस पाठविण्यात येतात. मात्र शेतकरीच आपले धान्य आणत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यांना एसएमएस पाठविले आहे, त्यांनी धान्य केंद्रावर आणावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title:  In Dhule district only 5 quintals of munga are procured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे