पंतप्रधान आवास योजनेत धुळे जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST2021-09-12T04:41:28+5:302021-09-12T04:41:28+5:30

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच गुणात्मक प्रगती होण्याच्या दृष्टीने राज्यात ...

Dhule district first in PM housing scheme | पंतप्रधान आवास योजनेत धुळे जिल्हा प्रथम

पंतप्रधान आवास योजनेत धुळे जिल्हा प्रथम

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच गुणात्मक प्रगती होण्याच्या दृष्टीने राज्यात शंभर दिवसांचे महाआवास अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत नाशिक विभागात सर्वोत्कृष्ट कार्य करत जिल्हा आघाडीवर आहे. त्यात पंतप्रधान आवास योजनेत ७२.५० गुण मिळवत जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ६३.४० गुणांसह अहमदनगर जिल्हा दुसऱ्या स्थानी तर ५०.९० गुणांसह जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत अहमदनगरने ४९.६९ गुणांसह पहिला, धुळे जिल्ह्याने ४८.६६ गुणांसह द्वितीय, नाशिकने ३९.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी बाळासाहेब मोहन यांचा गौरव करण्यात आला. या वेळी उपायुक्त अरविंद मोरे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, कामगार उपायुक्त विकास माळी, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके उपस्थित हाेते. जिल्ह्याच्या कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Dhule district first in PM housing scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.