शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

धुळे जिल्हा कृषी विभागाने घेतले मातीचे २९ हजार नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:32 PM

उद्दिष्टपूर्ती: नमुने प्रयोगशाळेत पाठविले, शेतकºयांना होणार फायदा

ठळक मुद्देमाती नमुने संकलित करण्यासाठी शेतकºयांचे तयार केले गट शेतजमीनीतील घटकद्रव्यांची माहिती मिळतेमाती नमुने प्रयोगशाळेत पाठविले

आॅनलाइन लोकमतधुळे : खरिपाचा हंगाम सुरू झालेला  आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्याला  माती परीक्षणासाठी २९ हजार ५०   नुमने  घेण्याचे लक्षांक देण्यात आले होते. कृषी विभागाने नमुने संकलित करण्याची  उद्दिष्टपूर्ती केली असून, माती नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे प्रभारी कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी सांगितले.शेतकºयांना शेतजमिनीतील घटकद्रव्यांची माहिती व्हावी, त्यानुसार पिकांची निवड करून, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करता यावे यासाठी, माती परीक्षण करणे गरजेचे असते.  कृषी विभागाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात येते. त्यासाठी दरवर्षी जिल्ह्याचे उद्दिष्टही ठरविण्यात येत असते.  माती परीक्षणासाठी कृषी विभागातर्फे नमुन्यांचे संकलन करण्यात येत असते. यासाठी शेतकºयांचा गट तयार करून,  त्यांच्या शेतातील मातीचे नमुने घेऊन ते  एकत्रित करून, प्रमाणानुसार नमुने परीक्षणासाठी पाठविले जातात. माती परीक्षणासाठी बराच कालावधी लागत असतो.यावर्षी धुळे जिल्ह्याला २९ हजार ५० माती नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात धुळे तालुक्यातील ८३ गावातील सहा हजार, साक्री तालुक्यातील ११० गावांमधील ८ हजार ६५०, शिंदखेडा तालुक्यातील ७७ गावांमधील ७ हजार ६०० व शिरपूर तालुक्यातील ६७ गावांमधील ६ हजार ८०० मृद नमुने संकलितचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण करण्यात आले. हे मातीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल असे सांगण्यात आले.  

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती