धुळे शहरात भरदुपारी घरफोडी २० हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:52 IST2019-11-06T22:52:35+5:302019-11-06T22:52:54+5:30
वल्लभनगरातील घटना : श्वानाने नाल्यापर्यंत माग दाखविला

dhule
धुळे : शहरातील अग्रवाल नगर परिसरातील वल्लभ नगरात भरदुपारी बंद घरातील कार्यालय फोडून तेथील २० हजारांची रक्कम लांबविण्यात आली. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या श्वानाने दसेरा मैदानाजवळील नाल्यापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. तेथून ते वाहनाने पळाले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.
काबरा व्यवसायाने इंटेरियर डेकोरेटर आहेत. ते बुधवारी सकाळी शहरात साईटवर गेले होते. दुपारी बारा-साडेबारा वाजेदरम्यान चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला.घरातील त्यांच्या कार्यालयात प्रवेश करून लाकडी कपाट व त्यातील लॉकर तोडून त्यातील २० हजारांची रोख रक्कम लंपास केली. दुपारी काबरा जेवणासाठी घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेच चाळीसगाव पोलिसांना कळविले. पोलीस श्वान पथक व फिंगर प्रिंट एक्स्पर्टसह घटनास्थळी पोहचले. श्वानाने नाल्यापर्यंत माग दाखविला. मात्र तेथून चोरटे वाहनाने पळून गेले असावे, असा पोलिसांचाअंदाज आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.