लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दुचाकी चोरी करणाºया दोन संशयित तरुणांना शहर पोलिसांच्या शोध पथकाने दुध डेअरी परिसरातून ताब्यात घेतले़ त्यांची चौकशी केली असता त्यांनी दोन दुचाकी चोरल्याची कबूली दिली़ शिवाय त्या दोन दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत़ दुचाकी चोरीचे प्रकार घडत असल्याने पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना दिवसा आणि रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार शोध पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, हिरालाल बैरागी, नारायण कळसकर, हेड कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे, जगदीश खैरनार, किरण जगताप, मुक्तार मन्सुरी, दिनेश परदेशी, महेश जाधव, प्रल्हाद वाघ, एकलाख पठाण, संजय जाधव, संदिप पाटील, दिनेश शिंदे, दीपक दामोदर, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, योगेश चव्हाण हे रात्रीची गस्त घालत होते़ शासकीय दूध डेअरी परिसरात गस्तीवर असताना आकाश सुरेश धापटे (१८) आणि त्याचा मित्र नरेंद्र प्रल्हाद देवकर (२१) (दोन्ही रा़ सहजीवन नगर, दूध डेअरी परिसर, धुळे) यांना पकडण्यात आले़ त्यांनी कमलाबाई कन्या हायस्कूल आणि जेल रोड येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली़ त्या दोघा संशयितांना अटक करण्यात आली़
धुळे शहर पोलिसांनी पकडल्या चोरीच्या दोन दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:08 IST
दोन संशयित ताब्यात : ३५ हजाराचा मुद्देमाल
धुळे शहर पोलिसांनी पकडल्या चोरीच्या दोन दुचाकी
ठळक मुद्देशहर पोलिसांच्या शोध पथकाची कामगिरीदोन दुचाकी चोरट्यांना पकडले