धुळे-चाळीसगाव रेल्वे धावली विजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:19 IST2020-03-02T12:18:53+5:302020-03-02T12:19:17+5:30
स्वागत : दिवसातून चार फेऱ्या होणार

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तब्बल १०३ वर्षानंतर पहिल्यांदाच रविवारी सायंकाळी चाळीसगावहून धुळ्याकडे आलेली रेल्वे विजेच्या इंजिनद्वारे धावली़
रेल्वेस्थानकावर रेल्वेचे स्वागत झाले़ ब्रिटीश कालीन धुळे-चाळीसगावर रेल्वे अनेक वर्षापासून प्रवासी सेवा देत आहे़ सुरूवातीला कोळशावर, नंतर डिजेल इंजिनद्वारे रेल्वे १०३ वर्ष प्रवासी सेवा दिली़ दरम्यान तीन वर्षापासून धुळे चाळीसगाव पर्यत विद्यृतीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू होते़ काम पुर्णत्वास आल्यानंतर रविवारी पहिली फेरी विद्युत इंजिन लावून रेल्वे धावली़ रेल्वे प्रबंधक सुनील महाजन यांनी रेल्वे इंजिनचे लोको पायलट बी़ आऱ माळी, परिवहन निरीक्षक एऩ डी़ बडगुजर, लोपो निरीक्षक जी़ एम़ साबळे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले़